पुणे शहरातील पथारी हातगाडी धारकावरील अतिक्रमण कारवाई थांबवून नविन लायसन्स दया : बाबा कांबळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 5 February 2021

पुणे शहरातील पथारी हातगाडी धारकावरील अतिक्रमण कारवाई थांबवून नविन लायसन्स दया : बाबा कांबळे

 


पुणे :

रस्त्यात आडकाठी होते असे सांगत पुणे महानगरपालिका अधिकारी गोरगरीब टपरी पथारी हातगाडी धारकांवर कारवाई करत आहेत,  धनदंडगेयांचे  अतिक्रमणाकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले जात आहे,फेरीवाल्या कायद्याची पायमल्ली केली जात असून कायद्याने दिलेले संरक्षण नाकारले जात आहे, हा टपरी, पथारी, हातगाडी धारकांवर अन्याय असून प्रशासनाने गोर गरीब फेरीवाले यांच्यावरील अतिक्रमण कारवाई थांबवावी आणि नियमानुसार सर्व टपरी पथारी हातगाडी धारकांचे सर्वेक्षण करून सर्वाना लायसन्स देऊन पक्क्या गाळ्यात पुनर्वसन करावे  अशी मागणी टपरी, पथारी, हातगाडी पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केली आहे,


चंदननगर येथे एका राजकीय पुढाऱ्याच्या सागण्यावरून फळभाजी विक्रेत्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे, या विरोधात टपरी, पथारी, हातगाडी पंचायत वतीने पुणे महानगर पालिकेसमोर आज दि , ५-२-२०२१ रोजी दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत  धरणे आंदोलन करण्यात आले,


पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे पुणे शहर संघटक सामाजिक कार्यकर्ते रमेश सकट, यांनी आंदोलनाचे नेतूत्व केले , 


या वेळी सामाजिक कार्यकर्त्या अनिता सावळे , पुणे जिल्हा अध्यक्ष मल्हारराव काळे , सुलतान शेख , विभाग अध्यक्ष हनुमंत गवळी,राम गालफाडे, मीरा मातंग , सुरेखा गायकवड ,  संतोष जाधव, हिना कांबळे , चिंतामणी पोळ,आदी उपस्थित होते,


यावेळी शिष्टमंडळाने उपायुक्त  माधव जगताप यांची भेट घेऊन निवेदन सादर केले


अतिक्रमण कारवाई थांबलीच पाहिजे, सर्व फेरीवाल्यांचा नवीन सर्वेक्षण करून त्यांना लायसन्स  आणि पक्के गाळे मिळाले पाहिजे, आधी  पुनर्वसन मगच कारवाई अशी घोषणा या वेळी देण्यात आल्या,


यावेळी बाबा कांबळे म्हणाले पुणे महानगरपालिकेने फेरीवाल्यांसाठी कायदा केला असून या कायद्याप्रमाणे प्रत्येक पाच वर्षाला फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे परंतु पाच वर्षे पूर्ण झाले तरी महापालिकेने नवीन सर्वेक्षण सुरू केले नाही नवीन सर्वेक्षण  करण्याची प्रक्रिया राबवन्या  ऐवजी टपरी पथारी हातगाडी धारक फळ भाजी विक्रेत्यांवर  अतिक्रमण कारवाई करून त्यांना विस्थापित केले जात आहे हे अत्यंत चुकीचे असून या विरोधामध्ये आम्ही  संघर्ष  करून हे आंदोलन अधिक  तीव्र करणार असून आमच्या मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन यापुढेही सुरू राहील असे बाबा म्हणाले,

यावेळी रमेश सकट म्हणाले गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या टपरीधारकावर  पुणे प्रशासन कारवाई करत आहे परंतु धनदांडगे, मोठे उद्योजक यांनी केलेले अतिक्रमण याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे गरिबावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही गप्प बसणार नाही पुण्यातील सर्व फळ भाजी विक्रेत्यांना  एकत्र करून हा लढा पुढे सुरू ठेवू असे  रमेश सकट म्हणाले,


                

No comments:

Post a Comment

Pages