प्रा.राधाकिशन होगे यांना नांदेड विद्यापीठाकडून पीएच.डी.पदवी प्रदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 5 February 2021

प्रा.राधाकिशन होगे यांना नांदेड विद्यापीठाकडून पीएच.डी.पदवी प्रदान

किनवट प्रतिनिधी

दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर येथे कनिष्ठ विभागात कार्यरत असलेले अर्थशास्त्र  विषयाचे प्राध्यापक ,यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक तथा मराठा सेवा संघ नांदेडचे जिल्हाकार्याध्यक्ष होगे राधाकिशन अंबादासराव यांना स्वा.रा.तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत अर्थशास्त्र या विषयात दि. ३/२/२०२१ रोजी पीएच.डी. ही पदवी प्रदान करण्यात आली. सदरील पदवी संशोधनाचा विषय " नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास " (2010-2015) हा होता. हे संशोधन कार्य त्यांनी पीपल्स महाविद्यालय नांदेड येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख डाँ.विकास सुकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केले आहे. संशोधन कार्य पुर्ण केल्या बदल कै.दिगंबरराव बिंदू स्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी मंञी डाँ. माधवराव पाटील किन्हाळकर , संस्थेचे सचिव मुरादसाब मांजरमकर , महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष डाँ.वृषालीताई किन्हाळकर , प्राचार्य डाँ. पंजाब चव्हाण ,बिंदू महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मराठा सेवा संघ नांदेड चे जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर (उत्तर ), उध्दवराव सुर्यवंशी(दक्षिण), नांदेड जिल्हा जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा डाँ. विद्याताई पाटील,अरुणाताई जाधव व मराठा सेवा संघ अंतर्गत ३३ कक्षाचे पदाधिकारी, य.च.म.मुक्त विद्यापीठ नांदेड विभागीय केंद्राचे वरीष्ठ शै.सल्लागार डाँ. बी.के. मोहण साह्ययक कुलसचिव चंद्रकांत पवार स्वा.रा.ती.म.विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डाँ. अरुण तवार , डाँ. शिवाजी पाते ,डाँ.रमेश भालेराव , डाँ. बिरादार माधव ,डाँ.काळे संजय ,डाँ. जाधव जळबा,डाँ. मुंढे नामदेव,डाँ गजानन मुधोळकर  सह अनेक शैक्षणिक व सामाजिक चळवळीतील लोकांनी होगे सरांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष  अभिनंदन करुन हे संशोधन समाज उपयोगी पडावे ही अपेक्षा व्यक्त करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages