राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी स्वप्नील इंगळे पाटील यांच्या नावाची चर्चा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 4 March 2020

राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी स्वप्नील इंगळे पाटील यांच्या नावाची चर्चा

राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी स्वप्नील इंगळे पाटील यांच्या नावाची चर्चा
नुकताच राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
आपल्या पदाची मुदत संपल्याने आपण  राजीनामा दिल्याचे पाटील यांनी सांगितले.आता विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त झाल्याने या पदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मा.शरदचंद्र पवार यांनी पक्षात अनेक युवकांना संधी दिली आहे.त्यामुळे विद्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे महत्व त्या अर्थाने अधिक वाढले आहे .
राष्ट्रवादी काँगेस पक्षात वयाच्या 15 व्या वर्षापासून शाखाध्यक्ष,विभाग अध्यक्ष ,युवक चे शहर जिल्हा उपाध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस,विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष सध्या युवक काँग्रेस चे प्रदेश कार्यकारणी सदस्य असलेले उच्चशिक्षित ,संयमी व विदयार्थी नेते इंजि.स्वप्नील इंगळे पाटील यांची पक्षाने निवड करावी अशी मागणी विद्यार्थी व युवकांमार्फत मोठ्या प्रमाणात मा.शरद पवार व  
उपमुख्यमंत्री अजित पवार ,जयंत पाटील ,खा.सुप्रिया सुळे यचंयकडे होत आहे.

        स्वप्नील इंगळे हे एका सामान्य शेतकरी घरातील युवक असुन 2013 ते 2015 साली राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष असतांना आपल्या आक्रमक नेतृत्वातुन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रवादी काँग्रेस चे एकहाती वर्चस्व ठेवले. विदयार्थी प्रश्नांवर खोलवर अभ्यास असलेले स्वप्नील इंगळे यांनी अभियांत्रिकीची पदवी झाल्यावर त्यांनी अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांचे प्रश्न हाती घेतले व सलग 5 वर्षे अभियंत्रिकी च्या  विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यपीठात हजारो  विद्यार्थ्यांचे मोर्चे त्यांनी सलग 4 वर्ष काढले.व त्या मोर्चाचे नेतृत्व करत आपल्यातील संघठनात्मक कोशल्य दाखून दिले.
 
                फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असो बी. ए.च्या निकालात घोळ ,विद्यार्थ्यांच्या मूलभूत समस्येच्या प्रश्न ,शिष्यवृत्ती धारकांचे प्रश्न,युवकांचे प्रश्न ,बसचे प्रश्न असे अनेक प्रश्न त्यांनी उचून धरले व त्या प्रश्नांचा पाठपुरावा करू मार्गी लावले.त्यामुळे आजसुद्धा हजारो विदयार्थी त्यांच्या संपर्कात आहेत.
             विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी वेळप्रसंगी आक्रमक भूमीकसुद्धा घेतली .आंदोलने करत असतांना अनेक गुन्हे पडलीत पण त्यांनी परवा न करता आंदोलने चालुच ठेवले पक्षाला स्वप्नील इंगळे यांच्या सारख्या आक्रमक व संघटन कोशल्य असलेल्या कार्यकर्त्याची गरज आहे अशी चर्चा होत आहे .पक्षाने दिली ती जबाबदारी पार पडण्याची तयारी असल्याचे स्वप्नील इंगळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Pages