अंबाडी येथे शिवजयंती बौद्ध युवकांकडून उत्साहात साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 4 March 2020

अंबाडी येथे शिवजयंती बौद्ध युवकांकडून उत्साहात साजरी

  अंबाडी येथे शिवजयंती बौद्ध युवकांकडून उत्साहात साजरी




किनवट : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९० वा जन्मोत्सव अंबाडी (ता.किनवट) येथे अत्यंत उत्साहाने नुकताच साजरा करण्यात आला. यामुळे संपूर्ण गावात शिव-आंबेडकर प्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते.
      बुद्धिस्ट नवयुवक मिञ मंडळा तर्फे अंबाडी (ता.किनवट) येथे शिवरायांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली.या जयंती सोहळ्यात बौद्ध-मराठा समाजाच्या बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आदर्श निर्माण केला आहे.विशेष म्हणजे बुद्धिस्ट नवयुवक मिञ मंडळाकडून संपूर्ण गाववासीयांना भोजनदान देऊन, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राची प्रमुख रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.सर्वच जातीधर्मातील लोकांच्या कल्याणासाठी मानवतेच्या भावनेतून महापुरुषांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला आहे.त्यापैकी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे एक होते.
    शहरापासून जवळच असलेल्या अंबाडी गावात बौद्ध समाज बहुसंख्येने वास्तव्यास आहे.या ठिकाणी बौद्ध मेळावा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती,महात्मा फुले आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते.परंतु, यावर्षी गावातील बौध्द समाजातील तरूणांनी पुढाकार घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रमाणे प्रथमच शिव जयंती साजरी करून आदर्श निर्माण केला आहे.

No comments:

Post a Comment

Pages