अधिवेशनात असतानाही आमदार केरामांचे मतदार संघावर बारीक लक्ष. स्वीय सहाय्यकांकडून दुर्गम भागाचा तातडीने दौरा. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 4 March 2020

अधिवेशनात असतानाही आमदार केरामांचे मतदार संघावर बारीक लक्ष. स्वीय सहाय्यकांकडून दुर्गम भागाचा तातडीने दौरा.

अधिवेशनात असतानाही आमदार केरामांचे मतदार संघावर बारीक लक्ष.
   स्वीय सहाय्यकांकडून दुर्गम भागाचा तातडीने दौरा.



किनवट : मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात असल्याने मतदार संघातील दुर्गम भागाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी आमदार भीमराव केराम यांनी स्वीय सहायकांकरवी तातडीने दुर्गम भागाचा दौरा करून जनतेच्या समस्या जाणून घेण्याच्या सूचना केल्याने ग्रामीण भागातील जनता आमदारांच्या कर्तव्याप्रती समाधान व्यक्त करीत  आहे.
  किनवट - माहूर चे आमदार भीमराव केराम हे मागील काही दिवसांपासून मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी आहेत. अशा वेळी मतदार संघातील सोईसुविधांची निकडीची गरज असलेल्या अतिदुर्गम भागात वेळेवर प्रशासनाची मदत पोहोचावी, या कर्तव्यप्रणालीतून त्यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते यांना तातडीचे निर्देश दिले. आवश्यक असलेल्या सर्व ठिकाणचा दौरा करून सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सूचना केल्या.  दरम्यान, माहूर तालुक्यातील ग्रामीण व अतिदुर्गम भागातील गावात प्रकाश कुडमते व कार्यकर्त्यांनी माहूर तालुक्यातील रुई, हड्सनी, अनमाळ, तांदळा, शिवर, महादापूर, इवळेश्वर, कुपटी, बोरवाड़ी, भीमपूर आदी गावांचा दौरा करून सार्वजनिक निकडीच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जनतेच्या प्रश्नांबाबत केराम यांच्या असलेल्या  बांधीलकीने सर्वसामान्यांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. "आमदार है दमदार," अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.यावेळी स्वीय सहायक प्रकाश कुडमते यांच्यासह दौऱ्यात अँड. दिनेश येऊतकर, युवराज राठोड, निळुभाऊ, देवराव कुड़मते, संदेश केराम,भड़ंगे भाऊ यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Pages