नांदेड - डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीच्या अनुषंगाने नांदेड पोलीस अधिक्षक कार्यालयात बैठकीचे आयोजन पोलीस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी दि. 2 एप्रिल रोजी केले होते.
बैठकीस भदंत पैयाबोधी महाथेरो,आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते सुरेश दादा गायकवाड,रमेश सोनाळे, स्वप्नील नरबाग, रमेश गोडबोले ,सुभाष रायबोले ,सुरेश हटकर ,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष इंजि.प्रशांत इंगोले,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ.गंगाधर गायकवाड, वंचितचे प्रा.राजू सोनसळे,ॲड.यशोनिल मोगले,बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष सुखदेव चिखलीकर,कॉ.मारोती केंद्रे,अतिष ढगे नंदकुमार बनसोडे, चंद्रकांत चौदंते, राहुल सोनसळे, सतिश एडके, प्रबुध्द चित्ते, राहुल चिखलीकर,राहुल घोडजकर, कुणाल सोनाळे, विनोद नरवाडे, अशोक वागरे, विठ्ठल गायकवाड, प्रकाश रोकडे, आनंदा वाघमारे, अंकुश सावते, भिमराव बुक्तरे, अभय सोनकांबळे, अनिल वाघमारे, रोहण कहाळेकर, जयदिप पैठणे, सचिन सोनकांबळे, विजय कटके, शशिकांत हनमंते, अविनाश गायकवाड यांच्यासह या बैठकीला नांदेड शहरातील अनेक जयंती मंडळांचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
जयंतीमध्ये जातिय व धार्मिक सलोखा राखत शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत शारीरिक अंतर सुरक्षित ठेवत जयंती साजरी करण्यात येईल अशा सुचना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी बांधवांनी मांडल्या आहेत. तसेच माननिय जिल्हा प्रशासनाने परवानगी देऊन सर्वच शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्याची विनंती प्रशासनास करण्यात आली आहे.
बैठकीचा समारोप पोलीस अधिक्षकांनी केला आणि सर्व समाज बांधवानी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याची भावनिक हाक सदरील बैठकीत देण्यात आली. तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचना प्राप्त होताच लवकरच आणखी एक बैठक जयंतीच्या अनुषंगाने घेण्यात येईल असे नमूद केले आहे.
बैठकीस जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी व सामाजिक संघटनांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
एकंदरीतच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचा संकल्प या बैठकीत सर्वच कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment