औरंगाबाद :
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते दिनकर दादा ओंकार यांच्या मार्गदर्शनात आज पोलिस प्रशासनास डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती संदर्भात निवेदन सादर करण्यात आले असुन प्रशासनाने आखुन दिलेल्या नियम व अटी शर्थीना आधीन राहून भीम सैनिकांना जयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात यावी या आशयाची सकारात्मक चर्चा पोलिस उपायुक्त मीना मकवाना मॅडम यांच्या सोबत झाली असून आंबेडकरी चळवळीच्या वतीने ज्या मागण्या निवेदनात नमूद आहेत त्यासर्व वरिष्ठ पातळीवर पाठवून येत्या दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.या प्रसंगी ज्येष्ठ नेते बाबूराव कदम ,मिलिंद शेळके, नागराज गायकवाड़ ,विजय वाहूळ ,राहुल पवार, शिद्धोधन मोरे ,आनंद कस्तूरे ,सचिन भोले, बाळू वाघमारे ,जयश्रीताई शिर्के, प्रेम चव्हाण ,आनंद तायड़े ,सोनू नरवडे, कपिल बनकर, विशाल रगड़े ,अविनाश जगधने, विजय मिसाळ आदी भीमसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment