होळीच्या व्यंगचित्रावरून देगलूरच्या आमदारांचा थयथयाट राजकीय बळाचा वापर करून पत्रकाराची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 5 March 2026

होळीच्या व्यंगचित्रावरून देगलूरच्या आमदारांचा थयथयाट राजकीय बळाचा वापर करून पत्रकाराची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न

 होळीच्या व्यंगचित्रावरून देगलूरच्या आमदारांचा थयथयाट

राजकीय बळाचा वापर करून पत्रकाराची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न



नांदेड : होळी निमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या व्यंगचित्रावरून देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा संताप उफाळून आला असून त्यांनी पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. या व्यंगचित्रामुळे आमदार इतके संतप्त झाले की त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून थेट पत्रकाराविरोधात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून घेतली आहे. ‘लोक ऊर्जा’ या साप्ताहिकात होळी निमित्त ‘बुरा ना मानो होली है’ हा विशेष अंक प्रकाशित करण्यात आला होता. या विशेष अंकात देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्यावर व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. हे व्यंगचित्र आमदारांना खटकले असून त्यांनी कार्यकर्त्यांना सांगून लोकउर्जा‘चे संपादक पत्रकार कपिल उल्लेवार यांच्या विरोधात बिलोली येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यास सांगितले. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार जितेश अंतापूरकर यांच्या भूमिकेचा पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Pages