स्वप्नील इंगळे यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळावे यासाठी अनोखी शिफारस
राजकारणात एखादे पद हवे असेल तर पक्षात कोणत्याही मोठ्या नेत्याच्या वरदहस्ताची गरज असतेच आणि ते पद महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या पक्षाचे असेल तर , की ज्या मुळे महाराष्ट्रात नेतृत्व करण्याची संधी भेटत असेल तर ,त्यासाठी कामापेक्षा जास्त पक्षात एखाद्या मोठ्या वरदहस्ताची गरज लागते.
राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेस च्या प्रदेश अध्यक्ष पदासाठी सध्या सर्वच इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे कोणी दादाकडे, कोणी ताईकडे तर कोणी मोठ्या साहेबांकडे आपली वर्णी लागावी यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, विदयार्थी काँगेस चे पद असेल आणि विदयार्थी आपल्या नेत्याची मोर्चे बांधणी करणार यात काही नवल नाही.
राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष पदी इंजि.स्वप्नील इंगळे पाटील यांची नियुक्ती करावी या मागणी साठी विदयार्थ्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना पत्र लिहिले आहेत. शिफारस पत्र म्हणून त्यांचाच फोटो हा पत्रासोबत जोडलेला आहे. हीच आमची शिफारस हा मजकुर फोटोच्या वरच्या भागात लिहिला आहे. त्याची प्रत पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना पाठविण्यात आले आहे .
"इंजिनियरिंग विदयार्थी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुशांत पाटील म्हणाले की , आमचे मित्र व विद्यार्थ्यांचे खंबीर नेतृत्व स्वप्नील इंगळे हेमागील 15 वर्षांपासून पक्षाचे काम करत आहेत. त्यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या अत्यंत सक्षमपणे पार पाडल्या आहेत .आमच्यासारख्या अनेक विदयार्थी मित्र अडचणीत असतांना निस्वार्थीपणे त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहून हजारो विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळले ,आज त्यांच्या मदतीला आम्ही सर्व विदयार्थी मित्र खंबीरपणे उभे राहण्याचे ठरविण्यात आले आहे. आम्ही संघटना स्थापन करून सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे .आजपर्यंत आमच्या संघटनेचे ७१८६ सभासद झाले आहेत.त्यांनी
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न अत्यंत कुशलपनाने हाताळून त्यातून तोडगा काढला आहे . म्हणून भविष्यातपण विद्यार्थ्यांचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्यासाठी स्वप्नील इंगळे यांना पक्षाने प्रदेश अध्यक्ष पदाची संधी दयावी, अश्या मागणीचे ५००० हजार पत्र आम्ही पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना पाठवणार आहोत. पत्राच्या जोडीला पवार साहेबांचा फोटो हा शिफारस म्हणून जोडणार आहोत. असे पत्र महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातुन पाठविण्यात येणार आहेत. आमच्या संघटनेतील जास्त पदाधिकारी हे पुणे, मुंबई येथे जॉबसाठी किंवा शिक्षणासाठी आहेत . ५०-५० विदयार्थ्यांचे ग्रुप तयार केले आहेत. हे ग्रुप पक्षाचे अध्यक्ष व तसेच सर्व नेत्यांची भेट घेणार आहेत. आम्ही या कार्यकर्त्याची विदयार्थ्यांसाठीची व पक्षासाठीची तळमळ फार जवळून पहिली आहे. पक्ष जर शिफारस नसेल म्हणून एखाद्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला डावलत असेल तर पक्षावरचा सामान्य कार्यकर्त्याचा विश्वास कमी होईल.12 मार्च पासून पत्र पाठविण्यास प्रारंभ करण्यात येईल .
फार्मसी संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष सूरज कांबळे म्हणाले "आम्ही स्वा. रा. ती.म. विद्यापीठात सलग दोन वर्षे आमच्या मागण्यासाठी विद्यापीठ समोर उपोषणास बसलो असतांना कोणताही स्वार्थ नसतांना प्रत्येक वेळेस एका हाकेवर आमच्यासाठी आमच्या सोबत उभे राहणारे विदयार्थी नेते स्वप्नील इंगळे यांची पक्षाने दखल घ्यावी. अत्यंत संघर्षातील असलेले आक्रमक नेतृत्व त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ घालावी, यासाठी पक्षाचे नेते अजित पवार यांची बारामती येथे कालच भेट घेतली. या विषयावर चर्चा केली.तसेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहोत".
Monday, 9 March 2020
स्वप्नील इंगळे यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळावे यासाठी अनोखी शिफारस
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment