१० मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 9 March 2020

१० मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन

                   क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
१० मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन 


   उपेक्षित स्त्रियांचे शिक्षण व स्त्रियांवरील  अन्याय, अत्याचार आणि अनिष्ठ रूढी विरोधात अखंड संघर्ष करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला.
   महाराष्ट्रातील सामजिक क्रांतीचे जनक दलितांचे उद्धारक, सत्यशोधक समाजाचे नेते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या त्या धर्मपत्नी वयाच्या ९ व्या वर्षीच यांचा ज्योतिबांशी विवाह झाला. पत्नी या नात्याने. सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतीबा फ़ुले 'यांच्या बरोबरीने समाजसेवेचा वसा घेतला. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या आरंभीक टप्प्यात त्यांचे पती ज्योतीबाराव
फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगीरी बजावली. सावित्रीबाई फुले यानी शिक्षणाचा प्रसार केला. देशाच्या पहिल्या महिला मुख्याध्यापीका होत्या. त्या काळात मुलींच्या शिक्षणाला फारशी किमंत नव्हती. समाजातील उच्चवर्णात गणल्या जाणाऱ्याच्यातही स्त्री शिक्षणाविषयी अनास्थाच होती. अशाप्रकारे सर्वसाधारण समाजाची स्थिती मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत वाईटच होती त्यामुळे ज्योतीबा फुले यांनी मुलींच्या शाळा काढण्याचे व चालवण्याचे व्रतच घेतले.
   मुलीनी शिकावे म्हणून त्यानी शाळा सुरू केल्या, ज्योतीबाना शिक्षण कार्यात सहकार्य करण्यासाठी सावित्रीबाई स्वत: प्रथम शिकल्या त्यांनीअध्यापन कसे करावे याचे ही धडे घेतले. त्यानंतर व्यवस्थापन व अध्यापन दोन्हीही करू लागल्या स्त्री शिक्षणाचे कार्य त्यांनी नेटाने आणि ध्येयाने खुपच पुढे नेले.
   शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजचे आहे. स्त्रियाच्या आत्माविश्‍वास वाढवणे गरजचे, आहे हे सावित्रीबाईनी ओळखले. व काही क्रुर रूढीनाही त्यानी आळा घातला.
               बालजठर विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या १२-१३ वषी विधवा व्हायच्या अशा विधवा मुलींन एकतर सती जावे लागे.नाहीतर  केशवपन करून कुरूप बनवले जाई, ही स्त्री एखाद्या नराधमाचा शिकार.होत असे आणि समाज गरोदर विधवा म्हणून छळ करत असे अशा अवस्थेत या महिलापुढे जीव देणे नाहीतर भ्रुणहत्या करणे हाच पर्याय असे अशा अवस्थेत ज्योतीबांने बालहत्या प्रतिबधक गृह सुरू केले. सावित्रीबाईने ते समर्थपणे ते चालवले त्यात  गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळतपण करत त्याच गृहातील सर्व अनाथ बालकाना सावित्रीबाई आपलीच मुले मानत, याच ठिकाणी जन्मलेल्या एका ब्राम्हण काशिबाई विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्यांचे नाव यशवंत ठेवले. इ.स. १८९६-९७ च्या दरम्यान पुणे परिसरात प्लेगच्यासाथीने धुमाकूळ घातला. हा जीव  घेणा आजार अनेकांचा जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटीश सरकारने या रोगींना वस्तीपासुन लांब स्थालांतरीत करण्याचा उपाय योजला. त्यातून उदभवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंना प्लेग पीडीतांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखांना सुरू केला. त्या रोगांना व त्यांच्या कुंटबीयांना आधार देऊ लागल्या. हीच सेवा करतांना त्यांनीआपल्या स्वत:च्या प्रक्रतीची पर्वा न करता प्लेगपीडितासाठी सेवा करतांना सावित्रीबाईनाही प्लेग झाला.
त्यातून १० मार्च  १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. क्रांती ज्योती सावित्रीबाई यांनी समाजकार्याचा घेतलेला वसा शेवटच्या श्‍वासापर्यंत जपला. आज त्याचा स्मृतिदिन त्यानिमित्त विनम्र अभिवादन.

श्रीकांत संभाजी मगर                                                      मो.न.९६८९११७१६९

No comments:

Post a Comment

Pages