नांदेड जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण निश्चित
नांदेड, दि. 13 ऑक्टोबर :- नांदेड जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला. याबाबतची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर 2025 अन्वये आरक्षण कार्यक्रम दिल्याप्रमाणे नांदेड जिल्हा परिषदेच्या एकूण 65 निवडणूक विभागाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पडला. त्यानुसार निवडणूक विभागास आरक्षण निश्चीत करण्यात आले आहे.
नांदेड जिल्हा परिषदेतील निवडणूक विभागनिहाय आरक्षणाचा तपशील तालुकानिहाय पुढीलप्रमाणे दिले आहे.
माहूर तालुक्यात
१-वाई बा.- सर्वसाधारण,
२-वानोळा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
किनवट तालुक्यात
३-सारखणी- अनुसूचित जमाती,
४-मांडवी- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री),
५-गोकुंदा- सर्वसाधारण,
६-बोधडी बु.- अनुसूचित जमाती (स्त्री.),
७- जलधारा- अनुसूचित जमाती,
८-इस्लालपूर- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री).
हिमायतनगर तालुक्यात
९-सरसम (बु)- अनुसूचित जमाती (स्त्री),
१०-पोटा बु.- सर्वसाधारण (स्त्री्).
हदगाव तालुक्यात
११-निवघा (बा)- अनुसूचित जाती (स्त्री),
१२-रूई धा.- सर्वसाधारण (स्त्री),
१३-मनाठा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री),
१४-पळसा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,
१५-आष्टीा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,
१६-तामसा- अनुसूचित जमाती.
अर्धापूर तालुक्यात
१७-लहान- सर्वसाधारण,
१८-मालेगाव- सर्वसाधारण (स्त्री्),
१९-येळेगाव- सर्वसाधारण (स्त्री्).
नांदेड तालुक्यात
२०-वाजेगाव- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री),
२१-वाडी बु.- सर्वसाधारण,
२२-लिंबगाव- अनुसूचित जाती,
२३-धनेगाव- सर्वसाधारण (स्त्री्),
२४-बळीरामपूर- अनुसूचित जाती.
मुदखेड तालुक्यात
२५-बारड- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,
२६-मुगट- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
भोकर तालुक्यात
२७-पाळज- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,
२८-भोसी- अनुसूचित जमाती (स्त्री्),
२९-पिंपळढव- सर्वसाधारण.
उमरी तालुक्यात
३०-गोरठा- सर्वसाधारण (स्त्री),
३१-तळेगांव- अनुसूचित जाती.
धर्माबाद तालुक्यात
३२-करखेली- सर्वसाधारण,
३३-येताळा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
बिलोली तालुक्यात
३४-आरळी- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,
३५-सगरोळी- सर्वसाधारण (स्त्री्),
३६-लोहगांव- सर्वसाधारण,
३७-अटकळी- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री).
नायगांव (खै.) तालुक्यात
३८-बरबडा- सर्वसाधारण (स्त्री),
३९-कुंटूर- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री).
४०-मांजरम- अनुसूचित जाती (स्त्री),
४१-नरसी- अनुसूचित जाती (स्त्री).
लोहा तालुक्यात
४२-सोनखेड- सर्वसाधारण,
४३-वडेपूरी- सर्वसाधारण (स्त्री),
४४-उमरा- सर्वसाधारण,
४५-सावरगांव न.- सर्वसाधारण,
४६-कलंबर बु.- सर्वसाधारण (स्त्री),
४७-माळाकोळी- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री).
कंधार तालुक्यात
४८-शिराढोण- सर्वसाधारण,
४९-कौठा- अनुसूचित जाती (स्त्री्),
५०-बहाद्दरपुरा- सर्वसाधारण (स्त्री),
५१-फुलवळ- सर्वसाधारण (स्त्री),
५२-पेठवडज- सर्वसाधारण,
५३-कुरूळा- सर्वसाधारण.
मुखेड तालुक्यात
५४- जांब बु.- अनुसूचित जाती,
५५- चांडोळा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री),
५६- एकलारा- सर्वसाधारण,
५७-येवती- अनुसूचित जाती,
५८-सावरगाव पि.- अनुसूचित जाती (स्त्रीत),
५९-बा-हाळी- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री),
६०-मुक्रामाबाद- सर्वसाधारण (स्त्री्).
देगलूर तालुक्यात
६१-खानापूर- अनुसूचित जाती (स्त्री्),
६२-शहापूर- अनुसूचित जाती,
६३-करडखेड- अनुसूचित जाती (स्त्री्),
६४-मरखेल- सर्वसाधारण (स्त्री),
६५- हाणेगाव- सर्वसाधारण.
No comments:
Post a Comment