जि.प.प्राथमिक शाळा मलकजांब येथे 'व्यसनाची' केली होळी ! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 9 March 2020

जि.प.प्राथमिक शाळा मलकजांब येथे 'व्यसनाची' केली होळी !

जि.प.प्राथमिक शाळा मलकजांब येथे 'व्यसनाची' केली होळी !


किनवट :  किनवट  शहरा पासून 56 किलोमिटर अन्तरावर मलकजाम हे गाव असून तेथे इयत्ता 1ली ते 7वी ची जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा आहे.तेथील उपक्रमशील शिक्षक  राजा यादवराव तामगाडगे यांच्या कल्पकतेतून आणि शाळेचे मुख्याध्यापक वाय.नविनरेड्डी, जीवराज जाधव व शाळेतील सर्व गुणिजन विध्यार्थी यांच्या सहकार्याने तंबाखू,गुटखा,सिगरेट,दारु व तत्सम अमली पदार्थांची होळी करण्यात आली.यावेळी  मुलामुलींनी  आम्ही जीवनाची वाताहत करणारी नशा कधीच करणार नाही व आमच्या घरातील कुणालाही  नशा करु देणार नाही, अशी व्यसन  मुक्तीची शपथ घेतली.
   शेख आयान,दिग्विजय,आखिल, सात्विक ,मनिचरण यांनी व्यसन मुक्तीचे नारे दिले व परिसर दणाणून सोडला.तेव्हा  सजग  नागरिकांनी  गुणीजनाचे कौतूक केले,.तम्बाखुमुक्त भारत,सुदृढ भारत ही भूमिका  राजा तामगाडगे यांनी समजाऊन सांगितली.या अनोख्या 'व्यसनाची  होळी' उपक्रमांचे  कौतुक करुन असा उपक्रम राबविल्या बाबद उपस्थित नागरिकांनी शाळेचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Pages