अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १३ मार्च रोजी औरंगाबाद येथे दिवा बत्ती आंदोलन. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 9 March 2020

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १३ मार्च रोजी औरंगाबाद येथे दिवा बत्ती आंदोलन.

अखिल भारतीय किसान सभेच्या 
 (महाराष्ट्र) वतीने १३ मार्च रोजी औरंगाबाद येथे दिवा बत्ती आंदोलन.


औरंगाबाद : इनाम जमिनी व वक्फ बोर्डाच्या जमीनी व गायरान जमिनी कसणारांच्या नावे करा या मागणीसाठी, अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने औरंगाबाद येथे दिनांक १३ मार्च  रोजी राज्यव्यापी "दिवा बत्ती आंदोलन",  करण्यात येणार आहे.
    महाराष्ट्रभरातून हजारो शेतकरी या आंदोलनात सामील होणार आहेत.आंदोलनात सहभागी होऊन शेतकरी एकजूट मजबूत करा,असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.अशोक ढवळे,माजी आमदार जे.पी.गावीत, किसन गुजर, राज्य कार्याध्यक्ष अर्जुन आडे, राज्य सरचिटणीस
 डॉ.अजित नवले व उमेश देशमुख यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages