वाघाने केली वासरा शिकार; येंदा (पेंदा) शिवारातील घटना
किनवट : बोधडी (बु.ता.किनवट) वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीतील येन्दा (पेन्दा) शिवारात गुलाब सदाशिव पडवाळ यांच्या शेतात बांधून असलेल्या वासरावर वाघाने हल्ला करुन मारुन टाकले. गायींवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दावे तोडून गायीने आपला प्राण वाचवला. सदर घटना सोमवारी ( दि.९) उत्तररात्री घडली.
पैनगंगा अभयारण्यातील वाघाने येन्दा-पेन्दा शिवारात शिरकाव केल्याने रात्री शेतात थांबणा-या शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे शेतक-यांनी सांगितले. वनविभागाच्या वनपाल वनरक्षकांनी जायमोक्यावर पंचनामा केला आहे. वनविभागाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी पडवाळ कुटूंबियाची मागणी आहे.
येन्दा (पेन्दा) शिवारातील गुलाब सदाशिव पडवाळ यांच्या शेत गट क्र.१०७ या शेतात रात्री बांधून असलेल्या गाईंच्या कळपात वाघ शिरला. मोठ्या गाईंना शिकार करण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, गाईंच्या गळ्याला बांधलेले दावे तोडून सर्व गाईंनी आपले प्राण वाचवले. परंतु, लहान वासराच्या गळ्यातील दोर न तुटल्याने वाघाने त्या वासराची शिकार केली.मोठ्या गाईंच्या गळ्यातील दावे तुटले नसते तर मात्र अनेक गाई वाघाने मारल्या असत्या. या घटनेत पंधरा हजाराचे नुकसान झाल्याचे शेतक-याचे म्हणने आहे. पडवाळ यांनी बोधडी वनविभागाच्या संबंधितांना सदर घटनेची माहिती दिल्यानंतर त्या बिटचे वनपाल व वनरक्षकांनी जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला.
Monday 9 March 2020
वाघाने केली वासराची शिकार;येंदा(पेंदा)शिवारातील घटना
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment