आपण स्वतः लिंगभेद न करता महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी - न्यायाधीश जहांगीर पठाण
किनवटमध्ये निर्भया वॉक फेरी
किनवट : समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपण स्वतः स्त्री -पुरुष असा लिंगभेद न करता महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी. संविधानाने आपणास दिलेल्या हक्क अधिकाराची जाणीव ठेवावी, असे प्रतिपादन सह दिवाणी न्यायाधीश जहांगीर पठाण यांनी केले.
किनवट पोलिस स्टेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित् आयोजित निर्भया वॉक फेरीचा प्रारंभ करतांना काल(दि.८) ते बोलत होते.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरीक्षक मारोती थोरात, अभियंता प्रशांत ठमके, नायब तहसिलदार मोहम्मद रफिक, केंद्र प्रमुख रमेश राठोड, रामा ऊईके, शिवाजी खुडे, विजय मडावी, प्रकाश होळकर, प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे, प्रा.डॉ. पंजाब शेरे,महिला दक्षता समितीच्या सदस्या सुरेखा काळे, गंगुबाई परेकार, प्रीती मुनेश्वर, भावना दीक्षित, परविनबेगम, रजिया शेख, आशा कदम आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
सावित्रीबाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगी ठमके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून छत्रपती शिवराय चौकातून फेरीस प्रारंभ झाला. राष्ट्रपिता जोतीराव फुले -सावित्रीमाई फुले चौक, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे चौक, राष्ट्रनिर्माते डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक, शहीद बिरसामुंडा चौक, अशोक स्तंभ या मार्गाने ही फेरी काढण्यात आली. उत्तम कानिदे यांनी सूत्रसंचालन केले.
या फेरीत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनी , पाटील स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या विद्यार्थिनी, शिक्षिका, महिला पोलिस आदिंची बहुसंख्येनं उपस्थिती होती . अंकुश मुळे यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने सर्वांचे लक्ष वेधले होते.
Monday, 9 March 2020

आपण स्वतः लिंगभेद न करता महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी - न्यायाधीश जहांगीर पठाण
Tags
# तालुका
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment