जागतिक महिला दिन व संत गाडगेबाबा जयंती साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 9 March 2020

जागतिक महिला दिन व संत गाडगेबाबा जयंती साजरी

जागतिक महिला दिन व संत गाडगेबाबा जयंती साजरी



किनवट : संत गाडगेबाबा ज्ञानप्रबोधिनी अभ्यासिका व (कै.) कांतराव रामतीर्थकर सार्वजनिक वाचनालय  यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व गाडगेबाबा जयंती काल(दि.८) साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नंदिनी पाटील व प्रा.डॉ.  विजयाताई खामनकर - काळे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुमन तेलंग या होत्या.  यावेळी  ग्रंथालय चळवळीत सक्रीय असलेल्या ग्रंथपाल कल्पना आबाराव सिडाम यांचा सत्कार करण्यात आला.

   गाडगेबाबा जयंतीनिमित्त विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव रामतीर्थकर यांनी केले. याप्रसंगी प्रा. बालाजी तेलंग यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना गणित व संस्कृत विषयाचा कसा उपयोग करावा, यावर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख सरफराज कुरेशी,गुलाब पेंदोर, मयुरी रामतीर्थकर आदींनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment

Pages