माहूर येथे बौद्ध वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 8 March 2020

माहूर येथे बौद्ध वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन

माहूर येथे बौद्ध वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन
माहूर : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  विचार मंच, माहूर च्या वतीने बौद्ध वधू -वर परिचय मेळाव्या चे आयोजन दि.१५ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जगदंबा धर्मशाळा येथे करण्यात आल्याची माहीती सिद्धार्थ तामगाडगे , राहुल भगत व नवीन वाघमारे यांनी दिली.
      समाजातील पालकांना एकाच वेळी एकच ठिकाणी वधु वर संशोधन करणे सोयीचे जावे म्हणून या वर्षी  शहरात प्रथमच बौद्ध वधु वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे .या मेळाव्यात विवाहयोग्य वधु -  वरांची संपूर्ण माहिती असलेली पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे.या बौद्ध वधु वर परिचय मेळाव्याच्या समाजोपयोगी कार्यात सहभाग घ्यावा ,असे आवाहन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, माहूर  च्या वतीने सिद्धार्थ तामगाडगे  राहुल भगत,नवीन वाघमारे,सुधीर साबळे,रवींद्र गायकवाड, शंतनु कांबळे  अमोल शेंद्रे, रेणुकादास वानखेडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages