जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीत रंगणेनिवार व दहिफळे यांच्यात चुरशीची लढत ; 4 एप्रिल रोजी निकाल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 2 April 2021

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीत रंगणेनिवार व दहिफळे यांच्यात चुरशीची लढत ; 4 एप्रिल रोजी निकाल

 

किनवट, ता.२ :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, नांदेड च्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकी करिता आज मतदान संपन्न झाले आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे  तालुक्यातील उमेदवार व बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक दिनकर ओमप्रकाश दहिफळे व  तालुक्यातील अभ्यासू कार्यकर्ता अशी ओळख असलेले सुरेश रंगणेनवार यांच्यात थेट लढत झाली आहे. खा.प्रताप पाटील चिखलीकर व आ.भीमराव केराम यांनी रंगेनवार यांच्या विजया करिता प्रतिष्ठा पणाला लावली आहे. माजी आमदार प्रदीप नाईक यांनी देखील आपली प्रतिष्ठा, दहिफळे यांच्या विजया करिता लावली आहे. यासाठी आज(ता.२) तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर खेळीमेळीच्या वातावरणात मतदान संपन्न झाले .

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पुरवण्यात यावा, अशी मागणी एका पत्राव्दारे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांच्याकडे केली होती. अत्यंत चुरशीची ही निवडणूक झालीआहे. किनवट तालुक्यातील ४४ मतदार हे तालुक्यातून एक संचालक व जिल्ह्यातील ५ संचालकांना मतदान केले. यापैकी कोणाचे पारडे जड आहे व कोण विजयी होणार हे ४ एप्रिल रोजी निकालाअंती समजणार आहे.या निवडणुकीचा निकाल नांदेड येथे संपन्न होणाऱ्या मतमोजणी नंतर समजणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages