बंजारा समाजाने संघटित राहणे काळाची गरज...माजी आ.प्रदिपजी नाईक...
पारंपारीक वेशभुषेत वाडी,तांडयातील बंजारा समाज लेंगी स्पर्धेला मोठया प्रमाणात उपस्थिती....
किनवट (बातमीदार)
वाडी,तांडयात राहणाया बंजारा समाजाने संघटित राहुन समाजाची बोलीभाषा,वेशभुषा,परंपरा कायम टिकुन राहण्यासाठी समाजाच्या वतीने होत असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमाला सहकार्य करावे.असे मत माजी आ.प्रदिपजी नाईक यांनी संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमीताने आयोजीत लेंगी स्पर्धेच्या व्यासपिठा वरुन अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
बंजारा समाजाचे अराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या 281जयंतीच्या निमीताने सारखणी येथे अखिल भारतीय गोर बंजारा लेंगी स्पर्धेचे आयोजन विशाल जाधव मित्रमंडळाच्या वतीने दि.29 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन माजी आ.प्रदिपजी नाईक हे होते.उदघाटक म्हणुन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव होते.तर स्वागताध्यक्ष म्हणुन प्रा.कैलाश राठोड हे होते.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन यादवराव जाधव,प्रफुल राठोड,जि.प.सदस्य मधुकर बाबा राठोड,प्रविण मँकलवार,जि.प.सदस्या सुनयना जाधव, संध्याताई राठोड,काँ अर्जुन आडे,बंडु नाईक,प्रकाश गब्बा राठोड शिवराम जाधव,अँड राहुल नाईक,पत्रकार दुर्गादास राठोड,ईशवर जाधव,विजय जाधव,जयपाल जाधव,विनोद चव्हाण चिंदगिरीकर,नकुल चव्हाण,रोहीदास जाधव यांची उपस्थिती लाभली होती.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत श्री सेवालाल महाराज,कै.स्व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना माजी आ.नाईक यांनी बंजारा समाजाची खरी संस्कूती,वेशभुषा,बोलीभाषा कायम टिकुन राहण्यासाठी व येणाया पुढील पिढीला यांची माहीती होण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमातुन लेंगी स्पर्धेच्या माध्यमातुन जनजागरण होणे काळाची गरज अाहे असे ते म्हणाले.
तर समाधान जाधव यांनी बोलताना लेंगी स्पर्धा सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातुन बंजारा समाजाच्या तरुण युवक युवतीना आपल्या बंजारा लेंगीचे महत्व कळवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आयोजन समितीच्या वतीने संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणुक देखील काढण्यात आली.विवीध भागातुन विवीध जिल्हयातुन आलेल्या लेंगी मंडळाने बंजारा समाजा विषयी वेगवेगळे प्रदर्शन,नूत्य,कला करत लेंगी म्हणत स्पर्धेत सहभाग घेतला.
या कार्यक्रमास किनवट,माहुर तालुक्यातील वाडी,तांडयातील बंजारा समाज मोठया संख्येने उपस्थित होता.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अर्जुन जाधव यांनी केले.दरम्यान सदरील लेंगी स्पर्धेचे निरीक्षक म्हणून देवीसिंग महाराज, दशरथ नाईक, राहुल राठोड लतिका वसंत पवार यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक विशाल जाधव यांच्यासह त्याच्या मित्रमंडळाने परिश्रम घेतले.
Tuesday 3 March 2020
बंजारा समाजाने संघटित राहणे काळाची गरज...माजी आ.प्रदिपजी नाईक...
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment