देशात विकार फोफावत असतांना आंबेडकरी विचार अधोरेखित करणे, ही काळाची गरज आहे - प्रा. डॉ. प्रतिभा जाधव निकम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 3 March 2020

देशात विकार फोफावत असतांना आंबेडकरी विचार अधोरेखित करणे, ही काळाची गरज आहे - प्रा. डॉ. प्रतिभा जाधव निकम

देशात विकार फोफावत असतांना आंबेडकरी विचार अधोरेखित करणे, ही काळाची गरज आहे -  प्रा. डॉ. प्रतिभा जाधव निकम

 सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल (महिला विंग) द्वारा नागपुरला आयोजित - प्रथम अखिल भारतीय आंबेडकरी विचार महिला परिषदेत सम्मेलनाध्यक्षाचे कथन...!


नागपूर :  समताधिष्ठित समाज रचना स्थापित करणे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक स्वप्न होते. ध्येय होते. म्हणुन बाबासाहेबांनी आपण प्रथम भारतीय, अंतिम भारतीय आहोत. आणि भारतीय भावनेशिवाय सर्व गौण आहे असा विचार आपल्याला दिला. जन्माने मिळालेल्या उच्च निच ह्या वर्ण - वर्ग भावाला त्यांनी पुर्णत: नाकारले. कारण अश्या मानसिकतेमुळे शोषित आणि शोषक वर्ग निर्माण झाला. कुटुंब व्यवस्थेत स्त्रिला अनन्य साधारण महत्त्व असावे. ती शिक्षित झालेली असावी. सुसंस्कारित असावी. आधुनिक विचारसरणीची आणि तर्कसंगत विचार करणारी स्त्री, ही बाबासाहेबांना अभिप्रेत होती. परंतु ती काही अविवेकी पुरूषांच्या सामुहिक अत्याचारांना बळी पडत असल्याचे  दिसत आहे. तिचे शोषण ही होत आहे. मागासवर्गीय स्त्रीयांच्या समस्या ही वेगळ्या आहेत. अर्थात दुस-या भाषेत सांगायचे झाल्यास, देशात 'विकार' फोफावत असतांना आंबेडकरी विचार अधोरेखित करणे, ही काळाची गरज असल्याचे मत, नामांकित आंबेडकरी साहित्यिका प्रा. डॉ. प्रतिभा जाधव निकम (नासिक) ह्यांनी "प्रथम अखिल भारतीय आंबेडकरी विचार महिला परिषद २०२०" येथे अध्यक्ष पदावरून व्यक्त केले. त्याप्रसंगी जागतिक बौद्ध महिला परिषदेच्या अध्यक्षा तसेच सेलच्या महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदना मिलिंद जीवने ह्या सह-अध्यक्षा होत्या. सदर परिषदेचे उदघाटन सामाजिक कार्यकर्त्या संघमित्रा अशोक गेडाम ह्यांनी केले. तर मुंबई येथिल मुख्य अधिकारी सुलभा पाटील व प्रा. डॉ. प्रिती नाईक (महु, मध्य प्रदेश) ह्या प्रमुख पाहुण्या होत्या.
      सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल (महिला विंग) द्वारे आयोजित ह्या परिषदेत सम्मेलनाध्यक्ष प्रा.जाधव पुढे म्हणाल्या की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून, स्त्रियांना पुरूषांच्या बरोबरीने समतेचे अधिकार देवुन ह्या देशात एक क्रांती घडवुन आणली. सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महिला विंगचे संरक्षक डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य' ह्यांनी ही महिला परिषद आयोजित करुन, आम्हा आंबेडकरी स्त्रीयांना एक चांगला मंच उभा करुन दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले." सामाजिक आंबेडकरी कार्यकर्त्यां संघमित्रा अशोक गेडाम ह्यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात, "भारतातील प्रत्येक स्त्रीने आंबेडकर समजुन घेणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकर हे समतेचे नायक आहेत. स्त्री वर्गाचे उध्दारक आहेत. ह्या देशात जातीविहिन समाज व्यवस्था निर्माण व्हावी, हे त्यांचे स्वप्न होते. आम्हाला त्या दिशेने जाणे गरजेचे आहे." परिषदेच्या स्वागताध्यक्षा डॉ. किरण मेश्राम ह्यांनी सुरूवातीला स्वागताध्यक्षीय भाषण केले.
     आंबेडकरी विचार महिला परिषदेच्या प्रथम सत्राच्या अध्यक्षस्थानी बौद्ध आणि आंबेडकरी अभ्यासक प्रा. डॉ. सविता कांबळे ह्या होत्या. तर, ममता वरठे ह्या सह-अध्यक्षा होत्या. "आंबेडकरी स्त्री (?) ने दलित रहावे की बौद्ध व्हावे...?" ह्या विषयावरील चर्चेत सुषमा पाखरे (वर्धा), अस्मिता मेश्राम (भंडारा) ह्यांनी आपले विचार मांडले. संचालन प्रिया जांभुळकर ह्यांनी केले. दुस-या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. माधुरी गायधनी दुपते ह्या होत्या. तर इंजी. माधवी जांभुळकर ह्या सह-अध्यक्षा होत्या. "आंबेडकरी भारतीय स्त्री आणि अन्य भारतीय स्त्री ह्यांच्यामधील देववादाचा वैचारिक संघर्ष...!" ह्या विषयावरील चर्चेत वंदना भगत (नागपूर), प्रा. वर्षा चहांदे (नागपूर), प्रा. विशाखा ठमके (कन्हान) ह्यांनी सहभाग घेतला.
       परिषदेच्या समारोपाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी महिला परिषदेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. प्रतिभा जाधव निकम हत्या होत्या. तर सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदना मिलिंद जीवने ह्या सह-अध्यक्षा होत्या. उद्योजक विनी मेश्राम , सुलभा पाटील (मुंबई), प्रा. डॉ. प्रिती नाईक (महु, मध्य प्रदेश) ह्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्या प्रसंगी तिन नामांकित आंबेडकरी स्त्री मान्यवर - प्रा. विद्या सच्चिदानंद फुलेकर, छाया वानखेडे (गायिका), संघमित्रा अशोक गेडाम ह्यांना "सी. आर. पी. सी. रमाई राष्ट्रीय पुरस्कार २०२०" देवून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदर परिषदेत डॉ. किरण मेश्राम ह्यांनी पारित ठरावाचे वाचन केले. तर डॉ. मनिषा घोष ह्यांनी परिषदेचे संयोजन संचालन केले.
     सदर आंबेडकरी विचार महिला परिषदेच्या यशस्वीतेसाठी ममता वरठे, बबीता वासे, इंजी. माधवी जांभुळकर, डॉ. भारती लांजेवार, मीना उके, संजीवनी आटे, ममता गाडेकर, सुरेखा खंडारे, प्रिया जांभुळकर, साधना सोनारे, अॅड. निलिमा लाडे आंबेडकर, हिना लांजेवार, वीणा पराते,प्रा. शारदा गेडाम, अपर्णा गाडेकर, अल्का कोचे, छाया खोब्रागडे, संगिता पाटील चंद्रिकापुरे, मंगला वनदुधे, शीला घागरगुंडे, वैशाली राऊत, कल्पना गोवर्धन, ममता कुंभलकर, ज्योती खडसे आदी महिला पदाधिकारी वर्गानी परिश्रम घेतले. तर सेलच्या प्रमुख विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद जीवने 'शाक्य': ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सुर्यभान शेंडे, प्रा. डॉ. टी. जी. गेडाम, अधिर बागडे, आनंद वानखेडे, डॉ. राजेश नंदेश्वर, नरेश डोंगरे, रमेश वरठे, मिलिन्द गाडेकर, अनिल गजभिये, हितेंद्र सहारे, नंदकिशोर पाटील, राहुल वासे आदी पदाधिकारी वर्गांचे परिश्रम मोलाचे होते. भारतीय रेल्वे मंत्रालयाचे माजी सचिव इंजी. विजय मेश्राम, माजी उपजिल्हाधिकारी अशोक गेडाम, शिक्षण महर्षी डॉ. राजाभाऊ टांकसाळे, सच्चिदानंद फुलेकर, आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य इंजी. जी. डी. जांभुळकर ह्या मान्यवरांचे सदर परिषदेच्या यशात मोलाचा वाटा आहे.

No comments:

Post a Comment

Pages