पानिपत (हरियाणा) येथे "शिवजन्मोत्सव" हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, आदर्श खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा.
पानिपत : छत्रपती शिवरायांचं स्वराज्य मराठा साम्राज्याचा भगवा पताका अखंड भारतभर फडकवण्याची महत्वकांक्षा अभिमानाने बाळगणारे मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यात झालेल्या युद्धात मराठा जिंकण्याच्या पटलावर असतानाच आलेल्या नव्या दमाच्या कपटी अब्दाली सैन्यामुळे मराठयांचं अखंड हिंदुस्थानावर मराठी साम्राज्याचं स्वप्नं अपूर्णच राहिलं... परंतु पराभव निकट दिसत असतानाही मराठे पळून गेले नाही कि त्यांनी शरणागती पत्कारली, स्वराज्य विस्ताराचं स्वप्नं उराशी बाळगणारे मराठे अब्दालीच्या सैन्यासोबत शेवट पर्यंत लढत राहिले आणि म्हणूनचं त्यांचं शौर्य त्यांच्या पराक्रमापेक्षाही अजरामर राहिलं...
घोर पराभवाच्या जखमा मनावर आणि शरीरावर घेऊन पानिपतच्या युद्धाला पुरुन उरलेल्या मराठयांनी काळानुसार पानीपतची भूमी स्वत:ची मानली आणि मराठी संस्कृतीशी सांगड घालत तेथील्या संस्कृती सोबत नाळ जोडली... पानिपत, सोनपत, कर्नाल, कुरुक्षेत्र या भागात मराठा समाज हा रोड मराठा नावाने विखुरलेला आहे....आज रोड मराठयांच्या देहबोली आणि पेहरावात नक्की लक्षणीय बदल जाणवेल,तिथले मराठे हे अस्सल जाट असावेत असेच दिसतीलही परंतु शरीर रूपातील त्यांचा बद्दल त्यांच्यातल्या मराठी संस्कृतीचा अभिमान किंचितही बदलू शकला नाही आजही तिथल्या मराठयांच्या रक्तात शौर्य पराक्रम जन्मजात भिनला आहे तर मराठी संस्कृती त्यांच्या मनामनात आजही घर करुन आहे...
मराठयांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष देणारे पानिपतच्या भूमीत धारातीर्थी पडलेल्या मराठयांचे वारसदार आजही गर्वाने सांगतात आम्ही शूर मराठा सैनिकांचे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजेंचे वंशज आहोत...
घनघोर पानिपतच्या महायुद्धा नंतरही छळ अवहेलना अनंत संकट पराभवावर मात करुन रोड मराठ्यांनी आपल्या मातीपासून माणसांपासून हजारो मैल दूर आपले अस्तित्व टिकवून ठेवले...आज युद्धाच्या अडीचशे वर्षानंतरही शूर मराठयांचे वंशज आपले बांधव रोड मराठा नावाने परमुलुखात मराठी बाणा उंचावत आहेत, छत्रपती शिवरायांचे विचार अंगिकारून मराठ्यांचा शौर्य धैर्य पराक्रमाचा इतिहास मनामनात रुजवत आहेत यापेक्षा कौतुकास्पद गोष्ट दुसरी
काय ?
लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी आयोजन समितीचे आभार मानून येत्या काळात पानिपतच्या मराठयांची नाळ महाराष्ट्राच्या मातीशी अजून घट्ट जोडली जावी तसेच पानिपतमध्ये शूर मराठ्यांचे स्मारक उभारून त्या जागेला वॉर मेमोरीयलचा दर्जा देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची भावना व्यक्त केली...
Tuesday 3 March 2020
Home
राष्ट्रीय
पानिपत (हरियाणा) येथे "शिवजन्मोत्सव" खा. हेमंतभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा.
पानिपत (हरियाणा) येथे "शिवजन्मोत्सव" खा. हेमंतभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा.
Tags
# राष्ट्रीय
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
राष्ट्रीय
Labels:
राष्ट्रीय
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment