किनवट: तस्करी होणारे अवैध सागवान वन पथकाने पकडले ; चारचाकी वाहनांसह दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 3 March 2020

किनवट: तस्करी होणारे अवैध सागवान वन पथकाने पकडले ; चारचाकी वाहनांसह दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

किनवट: तस्करी होणारे अवैध सागवान वन पथकाने पकडले ; चारचाकी वाहनांसह दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त


किनवट : शहरा पासून नजीकच असलेल्या पिंपळगाव ( कि.ता.किनवट ) ते बेल्लोरी  या मार्गावर राखीव वनक्षेत्रातून बहुमोल सागवानाची टाटा एसीई AP१६-TW८०१४ वाहनातून अवैध पणे तस्करी करतांना किनवट चे वनपाल के.जी. गायकवाड व त्यांच्या  पथकाने  पकडले.ही घटना शनिवारी (दि. २९) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली..
   यावेळी   सागवानाचे चारपाट मारलेले १० नग ०.४८३६ घ .मी . ज्याची किमंत अंदाजे सत्तर हजार  रुपये व टाटा एसीई वाहन ज्याची किमंत एक लक्ष तीस हजार रुपये असा एकूण दोन लक्ष  रुपये किमंतीचा मुद्देमाल  जप्त करून वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
  हा अवैध सागवानाचा माल किनवट शहरात नेमका कोणत्या सॉ मील अथवा फर्निचर दुकानावर जाणार होता याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरचेची आहे,अशी वनप्रेमी नागरीकांची मागणी आहे .
    दि.२९ रोजी रात्री अकरा वाजता  च्या दरम्यान अवैद्य सागवानाचे नग भरलेले एक वाहन पिंपळगाव (कि) शिवारातून किनवट शहराकडे येत असल्याची गुप्त बातमी वनविभागाला मिळाली . उपवनसंरक्षक आशिष ठाकरे ,सहाय्यक वनसंरक्षक व्ही . एन .गायकवाड व वनपरिक्षेत्राधिकारी के .एन. कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली  वनपाल के.जी. गायकवाड तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना  सोबत घेऊन पिंपळगाव शिवार कडे कुच केली असता बेल्लोरी ते पिंपळगाव या मार्गावर वनविभागाचे पथक समोर येत असल्याची चाहुल लागल्यामुळे सागवान तस्करांनी अवैध सागवान लाकडा सहीत वाहनाला तेथेच रस्त्यावर सोडून पळ काढला. घटनास्थळावरून  वन विभागाच्या पथकाने मुद्देमालासह वाहन ताब्यात घेतले .वन विभागाच्या या पथकात  वनरक्षक संभाजी घोरबांड, अरुण चुकलंवार, साईदास  पवार,  वनविकास महामंडळाचे वनरक्षक सिंपाळे, वाघमारे ,काळेवाड वाहन चालक बाळू आवळे, भुतनर ,मोरे.वनमजूर  भाऊसींग जाधव आदी वनकर्मचा-यांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment

Pages