युवकांनी समाज माध्यमांचा उपयोग अत्यंत जबाबदारीने समाजहितासाठी करावा : न्यायमूर्ती जहांगीर पठाण
किनवट : समाजाने जेष्ठां ना सहानुभूती व सन्मानाची वागणूक द्यावी, युवकांनी समाज माध्यमांचा उपयोग अत्यंत जबाबदारी ने समाजहितासाठी करावा, असे आवाहन न्यायमूर्ती जहांगीर पठाण यांनी केले.
किनवट : समाजाने जेष्ठां ना सहानुभूती व सन्मानाची वागणूक द्यावी, युवकांनी समाज माध्यमांचा उपयोग अत्यंत जबाबदारी ने समाजहितासाठी करावा, असे आवाहन न्यायमूर्ती जहांगीर पठाण यांनी केले.
झेंडीगुडा(ता.किनवट) यादुर्गम गावात तालुका विधि सेवा समिती, किनवट न्यायालय वकील संघ व सरस्वती महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक जनजागृती शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. आनंद भंडारे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. न्यायमूर्ती जे. एन. जाधव, सरपंच रुख्मिनीबाई कुमरे, ऍड. मिलिंद सर्पे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.किनवट न्यायालय वकील संघाचे सचिव अॅड.दिलीप काळे यांनी प्रास्ताविक करीत विविध कायद्यांची सोप्या,सरळ व सुटसुटीत भाषेत ओळख करुन दिली.
पुढे बोलताना न्या पठाण म्हणाले की, 'आपल्या आई वडिलांनी आपल्या साठी काबाड कष्ट करून पालन पोषण केले, शिक्षण दिले. याची जाण ठेवणे गरजेचे आहे. त्यांचे हक्क अबाधित आहेत. त्यासाठी कायद्याने त्यांना संरक्षण दिले आहे. मोबाईल चा वापर अभ्यास व समाज हितासाठीच करावा. सध्या सायबर गुन्हा घडण्याच्या घटना अधिकघडत आहेत. कायद्याचे उल्लंघन करू नका.'याप्रसंगी बोलतांना न्यायमूर्ती जाधव म्हणाले की, 'कायदा सुव्यवस्थाअबाधित ठेवण्या साठी कायदे विषयक साक्षरता समाजात होणे आवश्यक आहे'. ग्राम विस्तार अधिकारी शिंदे,ऍड. राहुल सोनकांबळे ,विस्तार अधिकारी घुमटकर यांनीही विविध कायदे व सामाजिक जबाबदारी विषयी, आरोग्य, ग्रामस्वच्छता, पर्यावरण विषयी कायदे याबद्दल माहिती दिली. प्रारंभी सरस्वती व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दीप प्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. उपसरपंच आत्माराम मुंडे यांनी प्रस्ताविकातून कायदे विषयक जनजागृती शिबिराचा हेतू सांगितला. अध्यक्षीय समारोपात गावपातळी वर आवश्यक असलेल्या कायद्यांचे ज्ञान या शिबिरातून दुर्गम सीमावर्ती गावातील गावकऱ्यांना मिळाले. ते देण्यासाठी तालुका विधी सेवा समिती ने पुढाकार घेतला व शेवटच्या घटका पर्यंत सर्वांना न्याय हि भूमीका समजावून सांगितली. त्यामुळे या शिबीराचा हेतू सफल झाल्याचे प्रतिपादन केले. यावेळी ऍड. सुनील येरेकार ,ग्रामसेविका शुभांगी वऱ्हाडे, पो. पा. बालाजी बढे,विठ्ठल जायभाये, बीट जमादार बोनडलेवार ,ग्रामसेवक चव्हाण, पोलिस जमादार दोनकलवार प्रा.विजय उपलंचवार, प्रा. तपणकुमार मिश्रा, प्रा.अजय किटे यांच्या सह गावकरी स्त्री पुरुष शिबिरार्थी युवक युवती मोठया संख्येने उपस्थित होते. डॉ. सुनील व्यवहारे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.मार्तंड कुलकर्णी यांनी आभार मानले.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. रामकीशन चाटे, डॉ. किरण आयनेनिवार यांनी शिबिराचे आयोजन केले होते.
No comments:
Post a Comment