बडोद्याचे सयाजी महाराज गायकवाड - प्रियांका नारायण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 5 February 2021

बडोद्याचे सयाजी महाराज गायकवाड - प्रियांका नारायण

 


आज दि. ६ फेब्रुवारी.  (६-२-१९३९) बडोद्याचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड यांचा स्मृति दिन.

स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन ! व कोटी कोटी प्रणाम !!

आर्टस ईंटर परिक्षा उत्तिर्ण झाल्यानंतर सुभेदार रामजीबाबांना आता मात्र भिमाच्या शिक्षणाचा भार सोसेना. पण गुरुवर्य केळुस्कर मात्र भिमाच्या शिक्षणावर नजर ठेवून होते. सर नारायण चंदवरकरांच्या मध्यस्तिने बडोद्याचे सयाजी महाराज गायकवाड यांची मुंबई निवासस्थानी भेट घेतली. राजांना नमस्कार केला. गुरुवर्यासारखा एक विद्वान माणूस राजासमोर उभा होता तो भिमासाठी. युगप्रवर्तकाच्या ज्ञानार्जनात आर्थिक अडचण उभी ठाकली होती. त्या अडचणीचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांकडे मदतीचा हात मागण्यासाठी आज गुरुवर्य ईथे आले होते. “अस्पृश्यांना उत्तेजनार्थ सहाय्य देऊ” अशी घोषणा बडोदे नरेशानी मुंबई नगरभवनातील एका सभेत केली होते. आज गुरुवर्यानी महाराजांना त्या घोषणेची आठवण करुन दिली. अन हळूच भिमाला नरेशांसमोर उभं केलं. बडोद्याचे महाराज फार दयाळू व दलितांच्या उत्कर्षासाठी शेवट पर्यंत झटलेले एक महान व्यक्तिमत्व होते. महाराजांनी भिमाला काही प्रश्न विचारले. भिमानी प्रश्नाची उत्तर देऊन महाराजांना प्रसन्न केलं. महाराजांनी ताबडतोब मासिक रुपये २५/- ईतकी शिष्यवृत्ती भिमराव आंबेडकरांना जाहिर केली. गुरुवर्यानी भिमासाठी ज्ञानांच्या महामार्गाची सोय केली. बुद्धी वैभवात भर टाकण्याची सोय करुन दिली.


रामजी बाबांच्या निधनानंतर भीमरावांना बडोदा नरेशांची मुंबईत भेट घेण्याची संधी मिळाली. याच दरम्यान बडोदा नरेशानी ४ विद्यार्थ्याना अमेरीकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली. या भेटीत महाराजांनीच भीमरावांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले. भीमरावांनी तसा अर्ज दाखल केला. बडोदे राज्यातील शिक्षण मंत्रालयाने अमेरीकेतील शिक्षणासाठी बाबासाहेबांची निवड केली. केवढा हा योग. कित्येक अर्ज आले होते पण ईतक्या अर्जामधुन एक महार मुलाची निवड होते तेही अमेरीकेत शिक्षणासाठी. महाराजांचं कौतुक करावं तेवढं कमीच, आम्ही सगळे महाराजांचे ऋणी आहोत. तेंव्हा हि संधी मिळाली नसती तर आजही आम्ही वेशीबाहेरच असतो. बाबासाहेबांना अशी संधी देणारे बडोदा नरेश यांच्या या महान कार्याला शतश: प्रणाम. भीमरावाची निवड झाल्यावर करार पत्रावर सही करण्यासाठी ते बडोद्याला रवाना होतात. ४ जुन १९१३ रोजी उपशिक्षण मंत्र्यासमोर बाबासाहेबांनी करार पत्रावर सही केली. या करारा नुसार अमेरीकेतील शिक्षण पुर्ण केल्यावर भीमरावांनी बडोदा सरकारकडे १० वर्षे नोकरी करावी असे ठरले.


१९ मार्च १९१८ ला मुंबईत “अखिल भारतिय अस्पृश्य निवारण परिषद” भरविण्यात आली होती. या परिषदेचे सुत्रधार कर्मवीर शिंदे अन अध्यक्ष होते बडोदा नरेश श्री. सयाजीराव गायकवाड. महाराजांनी आपल्या भाषणात काही मुख्य गोष्टी सांगितल्या त्या या प्रमाणे, “ जातीचा चिरकाल टिकाव अशक्य आहे, जाती मानव निर्मीत आहेत. हे असच चालल्यास पुढे ख्रिश्चन धर्म याचा फायदा उठवेल. धर्मांतराचा फार मोठा धोका निर्माण होईल. व्यवहारीक सुधारणांची गरज आहे. अन्यथा एक दिवस आपल्या धर्मात मोठी फुट पडेल” अशा आशयाचं भाषण देऊन महाराजांनी जातीपातीचा नायनाट करण्यास आवाहन केलं होते.


१२ नोव्हे. १९३० रोजी लंडनला भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेतिल डॉ. बाबासाहेबांचे उत्कृष्ट भाषण ऐकूण या सभेत हिंदु लोकांमधे एक व्यक्ती मात्र कृतकृत झाली होती. चेह-यावर प्रसन्नता दाटुन आली. डोळे भरुन आले, आपल्या हातुन एक महान विद्वान घडविला गेल्याचा पुरावा मिळाल्यामुळे जन्म सार्थकी लागले अन डोळ्यातुन आनंदाश्रू वाहू लागले. समाधान व कौतुकानी यांचे हृदय ओसंडून वाहु लागले. ते व्यक्ती होते बडोद्याचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड. बाबासाहेबांना विदेशात पाठविण्यासाठी मदत करणार हेच ते राजे. आज बाबासाहेबांचा भीमपराक्रम पाहुन ते धन्य झाले होते. बाबासाहेबांना शुभेच्छा देऊन जेंव्हा तिथल्या राजवैभवी निवासस्थानी जातात, तेंव्हा राणीला ही शुभवार्ता सांगून महाराज म्हणतात, “आपले सारे प्रयत्न आणि पैसा सार्थकी लागला आहे. कार्य सिद्धिस गेले, या डोळ्यांनी एका विद्वानाची वैभवशाली वाटचाल बघितली. ही माझ्या अयुष्यातील एक अपूर्व घटना होती.” अन याच खुषीत महाराजांनी लगेच तिथेच बाबासाहेब व मित्रपरिवाराला एक मोठी मेजवाणी देतात.


अशा या बडोद्याचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड यांचा आज स्मृतिदिन आहे, त्यानिमित्त परत एकदा त्यांच्या स्मृतींना त्रिवार वंदन !

No comments:

Post a Comment

Pages