औरंगाबाद:
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते दिव्य मराठीचे प्रतिनिधी शेखर मगर यांचा पीएच डी प्राप्त केल्याबद्दल ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. व्यवस्थापन परिषद कक्षात शुक्रवारी (दि.पाच) झालेल्या पत्रकार परिषदेस प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.डी.बी.गायकवाड, जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे आदींसह पत्रकार उपस्थित होते. शेखर मगर यांनी 'दलित अत्याचारांच्या घटनांविषयी माध्यमांची भूमिका : एक चिकित्सक अभ्यास' या विषयावर संशोधन कार्य केले आहे. या विषयावर खूप मेहनत तसेच संशोधन करून त्यांनी विद्यापीठास प्रबंध सादर केला. संशोधनासाठी त्यांना डॉ विजय धारूरकर यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळाचा सदुपयोग करत त्यांनी स्वतः या संपूर्ण प्रबंधाचा मजकूर देखील कंपोज केला आहे. मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा...
No comments:
Post a Comment