कोरोणा काळात आॕनलाईन शिक्षण दिल्याबदल व शाळेतील विधार्थी शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याबदल सत्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 6 February 2021

कोरोणा काळात आॕनलाईन शिक्षण दिल्याबदल व शाळेतील विधार्थी शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याबदल सत्कार

नांदेड (प्रशांत बारादे) :- पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक २०२० च्या शिष्यवृत्ती परीक्षेत नविन नांदेड भागातील कच्छवेज् गुरुकुल स्कुल च्या विधार्थानी घवघवीत यश मिळवुन  तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आपल्या शाळेचे नाव लौकिक केले असुन यश संपादन केलेल्या विधार्थासह व त्यांचा पालकांचा  यांच्या नांदेड च्या नायब तहसिलदार सौ.उर्मिला कुलकर्णी व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा आदर्श शिक्षक मा.श्री प्रभाकर  कमटलवार सर यांच्या हस्ते प्रमाणप्रञ व सन्मान चिन्ह गौरव करण्यात आले .यशस्वी विधार्थामध्ये इ.पाचवीतुन श्रीनिवास सूर्यवंशी व इ.आठवीतुन अक्षत कच्छवे ,अंजली गोरे ,नेहा लुटे पाटिल ,विनायक मोरे ,आदित्य भारती व श्रद्धा वैदय  हे विधार्थी आहेत

              मार्च २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्यात शाळांना सुट्टी दिली होती .दि २७ जानेवारी पासुन इयत्ता पाचवी ते बारावीपर्यतचे वर्ग नियमित सुरु झाल्यानंतर शाळेच्या संचालिका तथा मुख्याध्यापिका सौ .दुर्गादेवी कच्छवे यांनी विधार्थी व पालकांचे हित लक्षात घेता कार्यक्रमात असे जाहिर केले की या वर्षी शैक्षणिक शुल्कात 75% सुट देण्यात येईल व उर्वरित शैक्षणिक शुल्क १० मार्च २०२१ पूर्वी भरणे बंधनकारक आहे .मुख्याध्यापिका सौ.दुर्गादेवी कच्छवे यांच्या धाडसी निर्णया बदल नायब  तहसिलदार सौ.उर्मिला कुलकर्णी मॕडम यांनी त्यांचे कौतुक केले व कार्यक्रमात त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला . यावेळी बालासाहेब कच्छवे ,आदित्य कच्छवे ,सचिन वसरणीकर ,प्रशांत बारादे,शिल्पा कत्तेवार ,उषा किनकर ,भाग्यश्री किनकर ,शिला अनंतवार व मंगल बुरांडे यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages