नर्सिंग क्षेत्रातील लिंगभेदाविरोधात जंतरमंतरवर देशव्यापी आंदोलन 80:20 धोरणाविरोधात; याचिका सुप्रीम कोर्टात सुरू – आदी बनसोडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 25 June 2025

नर्सिंग क्षेत्रातील लिंगभेदाविरोधात जंतरमंतरवर देशव्यापी आंदोलन 80:20 धोरणाविरोधात; याचिका सुप्रीम कोर्टात सुरू – आदी बनसोडे


दिल्ली,  प्रतिनिधी : 

2019 पासून केंद्र सरकारच्या नर्सिंग भरती प्रक्रियेत लागू असलेल्या 80% महिला – 20% पुरुष आरक्षण धोरणाविरोधात अखेर देशभरातून प्रचंड संतापाचा उद्रेक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर 23 जून 2025 रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर देशभरातील हजारो नर्सिंग विद्यार्थी, शिक्षक आणि संघटना नेत्यांनी एकत्र येत इतिहासातील सर्वात व्यापक आणि संघटित लिंगभेदविरोधी नर्सिंग आंदोलन उभं केलं.


हे आंदोलन "जॉइंट वर्किंग कमिटी"च्या नेतृत्वाखाली झाले असून, यात देशातील 28 राज्यांमधील शासकीय-खाजगी नर्सिंग संघटना, AIIMS&ESIC संघटना, विविध कोचिंग संस्था आणि युनियन प्रतिनिधी सहभागी झाले होते.


“लढा महिलांविरोधात नाही, अन्यायाविरोधात आहे!”


आंदोलनकर्त्यांनी एकमुखाने स्पष्ट केलं -

सेवेच्या क्षेत्रात लिंग नव्हे, कौशल्य आणि संवेदनशीलता महत्त्वाची असते. आरक्षणाच्या नावाखाली पुरुष नर्सेसवर अन्याय होतो आहे – हे थांबवले पाहिजे


या मुद्द्यावर सध्या सुप्रीम कोर्टात याचिका दाखल असून, कायदेशीर लढाही जोरात सुरू आहे. आदी बनसोडे यांनी स्पष्ट दिशारा दिला-

"जर निर्णय लवकर झाला नाही, तर आंदोलन देशभर पेटेल – ही फक्त सुरुवात आहे!


राष्ट्रीय पातळीवरील लढ्याचे पुढचे पाऊल – प्रत्येक राज्यात आंदोलन!

    आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात नर्सिंग क्षेत्रात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये याच मुद्द्यावर आंदोलन उभारण्याचे संकेत देण्यात आले आहेत.


या वेळी उपस्थित प्रमुख नेतृत्वांमध्ये शिवांकर उपाध्ये (मंगलागिरी), अर्पन मंजिक (पंजाब), राजमल अभिन्ना (दिल्ली), विकास डुकीया (लखनौ), एकता शेली (चंदीगड), जस्मिन कौर, भोलाराम मिना, नरेश विश्वनोई (राजस्थान), रामचंद्र मोगा, नविन जाट, सुरेंद्र डयामा, एजाज काजी (मंगलागिरी), अशिक अली (अलीगढ), रिंकू चौधरी, मदन सैनी आणि इतर राज्यांतील प्रमुख नर्सिंग लीडर, कोचिंग संचालक, संघटना अध्यक्ष व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


सरकारने त्वरित निर्णय घ्यावा – अन्यथा संघर्ष तीव्र होईल!

सर्व आंदोलनकर्त्यांची एकच मागणी  लिंगभेद बंद करा – सर्व नर्सिंग उमेदवारांना समान संधी द्या!

हा लढा केवळ रोजगारासाठी नव्हे, तर समानतेच्या संविधानिक हक्कासाठीचा लढा आहे, असा विश्वास आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. 

आदी बनसोडे छ. संभाजीनगर महाराष्ट्र राज्य 

 7743868217 

aadibansode7743@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages