किनवट,दि.९ : आदिलाबाद - पूर्णा - परळी या पॅसेंजर गाडीच्या वेळात बदल करावा.आदिलाबादहून पहाटे तीन वाजता सुटणाऱ्या या पॅसेंजर गाडीचा वेळ पूर्ववत चार वाजताचा करून ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीचे सचिव उध्वराव रामतिर्थकर यांनी सर्व संबंधितांकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
आदिलाबाद, मुदखेड, नांदेड मार्गावर अंबाडी, किनवट, मदनापूर,बोधडी हे रेल्वे स्टेशन येतात. पहाटे ३ वाजता ही पॅसेंजर गाडी आदिलाबाद येथून सुटते आणि ती गाडी ४ वाजता किनवट स्थानकावर येते. अंबाडी, हिमायतनगर, भोकर, नांदेडला जाणाऱ्या प्रवाशांना पहाटे २.३० वाजता उठावे लागते. किनवटहून जाणाऱ्या प्रवाशांची हीच परिस्थिती आहे.मांडवी, सारखणी, उमरी या भागातील प्रवाशांना ही गाडी उपयोगाची नाही. त्यामुळे या गाडीचा पूर्वीप्रमाणे ४ वाजताची वेळ निश्चित करावी, अशी मागणी रामतिर्थकर यांनी निवेदनात नमुद केली आहे.
आदिलाबाद - पूर्णा ही रेल्वे किनवट तालुक्यातील प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरत आहे. नांदेड येथे जाणाऱ्या अनेक प्रवाशांसाठी ही रेल्वे गाडी सोयीची ठरु शकते. मात्र, तालुक्यातील प्रवाशांना मध्यरात्री अडीच वाजता उठून रेल्वेस्थानक गाठावे लागत आहे. पूर्वी प्रमाणे आदिलाबाद या रेल्वेचा वेळ पहाटे ४ वाजता करावा आणि प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी रामतिर्थकर यांची मागणी आहे.
No comments:
Post a Comment