‘फळबाग’ व ‘शेततळे’ योजना घेऊन किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी - जिल्हा अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 8 August 2023

‘फळबाग’ व ‘शेततळे’ योजना घेऊन किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी - जिल्हा अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे

किनवट,दि.08(प्रतिनिधी) :  ‘फळबाग लागवड’ व ‘शेततळे’ या योजना घेऊन किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी आर.डी.रणवीर यांची प्रमुख उपस्थिती होती.


   किनवटचे तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी दि.03 व 04 ऑगस्ट रोजी तालुक्याच्या दौऱ्याचे नियोजन केल्याप्रमाणे विविध गावांना भेटी देऊन जि.अ.कृ.अ.बऱ्हाटेंनी शेतकऱ्यांशी चर्चा करीत त्यांच्या अडीअडचणी,समस्या समजून घेतल्या होत्या. दौऱ्यादरम्यान लिमगुडा पिंपळगाव सी. येथे  प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांची सभा आयोजित केली होती, त्यात जि.अ.कृ.अ.बऱ्हाटे बोलत होते. या सभेत बऱ्हाटेंनी शेतकऱ्यांनी मांडलेल्या अडचणी व समस्यांचे सोप्या पद्धतीने  निराकरण करीत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.


      दरम्यान, म.ग्रा.रो. हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणारे लिमगुड्याचे शेतकरी ज्ञानेश्वर राणू मेश्राम यांच्या पेरू व शंकर राणू मेश्राम  व दामा मेश्राम यांच्या आंबा फळबागेच्या लागवडीचा शुभारंभ जि.अधी.कृ.अ.बऱ्हाटे यांच्या हस्ते या फळांचे रोप लावून करण्यात आला.


       याचबरोबर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास कार्यक्रम या प्रकल्पामध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा सहभाग आणि सहकार्य अपेक्षित असल्यामुळे, मांडवी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयामध्ये वनविभाग व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सांगोपांग चर्चा होऊन सदरील प्रकल्प हा  शेतकऱ्यांच्या हितासाठी यशस्वी करण्यासाठी दोन्ही विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असा दृढनिश्चय व्यक्त करण्यात आला. यानंतर मांडवीचे गंगम्मा मोहनरेड्डी कुंटा यांनी आपल्या शेतात खोदलेल्या शेततळ्याची पाहणी करण्यात येऊन, याच पद्धतीने इतर शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. पुढे दहेली तांडा येथील राज्य पुरस्कृत सोयाबीन पीक प्रात्यक्षिक राबविणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये भेट देण्यात आली आणि सोयाबीन पिकांमधील कीड व रोगांचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आल्यानंतर, शेतकऱ्यांना लागणाऱ्या विविध खतांच्या पुरवठ्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती देण्यात आली. दहेली गावातील सतिश शामराव काळे यांनी भाऊ.फुंड.फळबाग योजनेमधून लागवड केलेल्या आंब्याच्या फळबागेला भेट देऊन आंब्यावरील विविध कीड व रोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आणि बाजारपेठेविषयी मार्गदर्शन करून बागेचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.



     या दौरा कार्यक्रमादरम्यान तालुका कृषी अधिकारी  बालाजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी यु.जे.नखाते व बी.आर.मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक जी.डी. भालेवाड, एस.पी.जाधव, एस.पी. बोंदरवाड, बी..डी.जाधव, व्ही.जी.खिल्लारे, आत्माचे तंत्र व्यवस्थापक एस.के.पटवे, कृषी सहाय्यक विकास पुरी, व्ही.एम.मुपकलवार,एस.डी.शेवाळे,एस.डी.निळकंठवार,एल.व्ही.देशमवाड,एस.डी.गिर्‍हे,श्रीमतीएस.जी.मेश्राम,श्रीमती एस.एन.वाडगुरे, श्रीमतीएम.एल.ताडेवार,श्रीमती आर.एस.आईटवार यांनी तालुक्यातील विविध ठिकाणी योग्य नियोजन करून दौरा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages