नांदेड ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अन्ड कल्चरल मुहमेंट नांदेड निर्मिती प्रमोद गजभारे प्रस्तुत बुद्ध पहाट या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या जय्यत तयारी च्या अनुषंगाने नुकतीच एका बैठकीत संयोजन समिती गठीत करण्यात आली आहे.
गेल्या तेरा वर्षापासून आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीत आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करणारा बुद्ध पहाट हा बुध्द-भिम गितांचा सांस्कृतीक कार्यक्रम यंदा ही दिनांक 16 मे रोजी पहाटे ठीक पाच वाजता कै.डाॅ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आयोजीत करण्यात आला आहे. मागील दोन वर्ष कोवीडच्या काळातही कार्यक्रम बंद नकरता शासनाच्या नियमाचे पालन करुन फेसबुक लाईव्ह ऑनलाईन कार्यक्रम करण्यात आला यास देश-विदेश पातळीवर लाखो लोकांनी पाहून प्रतिसाद दिला आहे. यंदा कोविड कमी झाल्याने व शासनाने सर्व निर्बंध उठवल्या मुळे या वर्षी बुध्द पहाट या कार्यक्रमाचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावर्षी कार्यक्रमास चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायिका व गायक कलावंत व स्थानीकचे विस कलावंतआपला सहभाग नोंदवणार आहेत या कार्यक्रमास भव्य दिव्य प्रकाश योजना आसणार आहे त्या अनुषंगाने कार्यक्रमाच्या जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी संयोजन समिती गठीत करण्यात आली आहे. संयोजन समिती पुढील प्रमाणे आहे. बुद्ध पहाट कार्यक्रमाचे संस्थापकीय अध्यक्ष रोहिदास कांबळे, (कार्याध्यक्ष) टि.पी.वाघमारे, (उपाध्यक्ष )डी. जी. ढवळे ,वसंत सोनकांबळे, (सचिव )इंजि. संजीवन गायकवाड (सहसचिव) दिनेश सूर्यवंशी, यशवंत कांबळे (कोषाध्यक्ष) बालाजी कांबळे (सहकोषाध्यक्ष) शेख नजीर, नागोराव ढवळे ,डी .टी .हनुमंते तर सल्लागार म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे, रविंद्र संगनवार,सुरेश गजभारे, इंजि. भारत कानिंदे, भीमराव धनजकर, अरुण केसराळीकर ,राजकुमार स्वामी,तर संयोजन समिती सदस्य म्हणून भगवान गायकवाड, पंडित आढाव, धर्मेंद्र कांबळे, काळबा हनमंते, संघरत्न चिखलीकर,उद्धव सरोदे,संजय रत्नपारखी, प्रसिद्धीप्रमुख सुभाष लोणे यांची निवड करण्यात आली आहे.तर चळवळीतील आदीचा सहभाग संयोजन समीतीत असणार आहे आसे कार्यक्रमाचे संयोजक प्रमोद गजभारे ,रोहीदास कांबळे,व प्रसिध्दी प्रमुख सुभाष लोणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे
No comments:
Post a Comment