मांडवी सिंचन प्रकल्पाचे कालवे दुरुस्त होण्याच्या आशा पल्लवित राष्ट्रीय बिरसा क्रांती दलाच्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 2 December 2023

मांडवी सिंचन प्रकल्पाचे कालवे दुरुस्त होण्याच्या आशा पल्लवित राष्ट्रीय बिरसा क्रांती दलाच्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

किनवट (प्रतिनिधी) : किनवट तालुक्यातील मांडवी येथील मध्यम प्रकल्पातून परिसरातील शिंगोडा, लिंगी, उनकेश्वर, लिंगी तांडा या गावच्या शिवारातून जात असलेल्या डाव्या व उजव्या कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यापासून आदिवासी शेतकरी बांधव गेल्या पंचवीस वर्षापासून वंचित असून, त्यांच्या समस्याचे निराकरण करून न्याय द्यावा, अशा आशयाचे निवेदन येथील रा.बिरसा क्रांती दलाच्या शाखेने ईमेलद्वारे  राज्यशासनासह संबंधित सर्वांकडे पाठविले होते. त्याची मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेऊन, तुमच्या समस्येच्या उपाययोजनेसंदर्भात संबधित विभागास कळविण्यात आल्याचा निरोप मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातून मेलद्वारा प्राप्त झाल्याची माहिती, संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र कुलसंगे यांनी दिली.


             मांडवी येथील सिंचन प्रकल्पातून जाणाऱ्या दोन कालव्यांमध्ये तांत्रिक दोष असल्याकारणे, एकीतून कायम पाणी झिरपत वाया जाते तर दुसरा कालवा ठिकठिकाणी फुटलेला असल्याने त्यातून पाणी शेवटापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे उपरोल्लेखित गावातील शेतकऱ्यांना गत अनेक वर्षापासून या पाण्याचा लाभच  मिळत नाही. सन्‌ 2019 पासून तर शेतकऱ्यांनी अनेक लेखी निवेदनाद्वारे आपले गाऱ्हाणे मांडूनसुद्धा या कालव्यांची दुरूस्ती केली गेली नाही. प्रशासनाकडे कालव्याऐवजी पाईपलाईन टाकून  तरी पाणी पोहोचविण्याची विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या पिडित शेतकऱ्यांनी राष्ट्रीय बिरसा क्रांती दल आदिवासी संघटनेकडे यासंदर्भात मदत मागितल्यानंतर लगेच संघटनेतर्फे राष्ट्रपती,पंतप्रधान,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पालकमंत्री आणि संबंधित सर्व कार्यालयांकडे ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन  पाठवून दाद मागितल्या गेली. योगायोगाने याचवेळी खा.हेमंत पाटील मांडवीस आल्यामुळे त्यांची भेट घेऊन, त्यांनाही निवेदन देऊन अडचण सोडविण्याची विनंती केल्यानंतर, तातडीने चक्रे फिरून 24 तासामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडून आपले निवेदन संबधित विभागाकडे पाठवून दिले असून, लवकरच समस्येबाबत कार्यवाही होईल, असे आश्वासन मिळाल्यामुळे, पिडित शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.


          या तातडीच्या प्रतिसादासाठी बिरसा क्रांतीदलाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यासह खा.पाटील यांचेही आभार मानले. यावेळी  संघटनेचे पदाधिकारी बि.क्रा.दल कर्मचारी संघटनेचे रमेश कोवे, ग्रा.जिल्हाअध्यक्ष जितेंद्र कुलसंगे, कार्याध्यक्ष अशोक सिडाम, प्रणय कोवे, शैलेश मेश्राम, मोहन कनाके, संदीप कन्नाके, रमेश परचाके, ,अशोक नैताम, ,संतोष पाडुरंग कनाके, सुखदेव सलाम आदींची  उपस्थिती  होती.

No comments:

Post a Comment

Pages