मार्तंड चेरले ची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 2 December 2023

मार्तंड चेरले ची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड

 किनवट:

येथील सरस्वती महाविद्यालयाचा विद्यार्थी मार्तंड बालाजी चेरले याची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

         यापूर्वीही मार्तंड चोरले याने विविध आंतर शालेय स्पर्धा, एकोणावीस वर्षाच्या आतील स्पर्धा  व आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत आपले नैपुण्य दाखवले आहे राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय  परभणी येथे आंतर महाविद्यालयीन केंद्रीय स्पर्धा संपन्न झाल्या त्यात प्रथम क्रमांक मिळवला. राष्ट्रीय स्पर्धेत आपलं नैपून्य दाखवून विद्यापीठ  व महाविद्यालया चा नावलौकीक करण्याचा मानस त्याने बोलून दाखवला. या निवडीबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानिवार, सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य डॉ आनंद भंडारे, क्रीडा संचालक डॉ विजय उपलंचवार सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages