प्रतिनिधी :
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी नारायण राणे यांच्या विरोधात संताप व्यक्त होत असून किनवट तालुका
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि 2 डिसेंबर रोजी जिजामाता चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी नारायण राणे मुर्दाबाद! कोंबडी चोर मुर्दाबाद अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल भाजप नेते नारायण राणे यांनी अपशब्द वापरून त्यांच्या अटकेची मागणी केली या विरोधात सबंध महाराष्ट्र राज्यातून संताप व्यक्त होत असून अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. किनवट तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश्वर पालमकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रवीण गायकवाड, ज्येष्ठ नेते किशन राठोड तालुका अध्यक्ष निखिल वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली दि 2 डिसेंबर रोजी येथील जिजामाता चौकात वंचितच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे. नारायण राणे मुर्दाबाद!कोंबडी चोर मुर्दाबाद! अशा घोषणा देऊन संताप व्यक्त केला. प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला महिला आघाडीच्या नेत्या आशाताई कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
वंचित आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर बहुजन चळवळीचे देशाचे नेतृत्व करतात.एका मतदार संघापुरत्या मर्यादित नारायण राणे सारख्या लोकांनी आपली मर्यादा ओळखून कोणत्याही विषयावर भाष्य केले पाहिजे. सवंग प्रसिद्धीसाठी कोणी जर जाणीवपूर्वक बाळासाहेब आंबेडकर बद्दल अपमान जनक बोलत असतील तर आम्ही ते खपवून घेणार नाही. यापुढे नारायण राणेच्या तोंडून आंबेडकरी नेते आणि चळवळी बद्दल बेताल वक्तव्य निघाल्यास त्यांना परिणाम भोगावे लागतील असा इशारा तालुकाध्यक्ष निखिल वाघमारे यांनी याप्रसंगी बोलताना दिला आहे. यावेळी आशाताई कदम राजू कांबळे शेख अजमल दिनेश कांबळे यांनीही आपल्या भाषणातून नारायण राणे यांच्या वक्तव्यचा खरपूस समाचार घेतला.
या निषेध आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव ज्ञानेश्वर खरे, दुधराम भोजू राठोड, सुरेश भुजबळ, आनंद बलखंडे,, एस के उमर फारूक शेख, याकूब शेख, आत्माराम चांदू हापसे, प्रवीण पाटील, अनिल वाडगुरे,राजूभाऊ गजभारे, रमेश भवरे,अमर शिंदे यांच्यासह वंचितचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment