विषमतेच्या या समाजात संविधानाने बीज पेरले समतेचे ते नाही कुण्या एकट्याचे ते तर सार्‍या भारतीयांचे... क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे मुक्त कवि संमेलनात संविधानाचा जागर... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 1 December 2023

विषमतेच्या या समाजात संविधानाने बीज पेरले समतेचे ते नाही कुण्या एकट्याचे ते तर सार्‍या भारतीयांचे... क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे मुक्त कवि संमेलनात संविधानाचा जागर...

किनवट:-

अभिमान संविधानाचा या कार्यक्रमा अंतर्गत क्रांतिसूर्य प्रतिष्ठान द्वारा व स्वाभिमानी युवा सेना तर्फे संयुक्त मुक्त कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते व्याखान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक तथा भारतीय बौद्ध महासभेचे अभियंता प्रशांत ठमके हे लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्रा.  शुभांगीताई ठमके , बळीराम पाटील महाविद्यालयाचे  उपप्राचार्य प्रा.डॉ. पंजाब शेरे , लेखक संशोधक नारायण डवरे यांनी संविधान दिना निमित्त विस्तृत असे  व्याख्यान दिले 

तर कवि संमेलनाध्यक्ष मी उजेड शोधतोयचे लेखक सुभाष बोड्डेवार हे होते.

प्रारंभी नंदा नगारे यांनी धम्म वंदना घेतली व स्वागत गीत प्राचार्य सुरेश पाटील यांनी सादर केले . सुत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय भवरे यांनी केले.

कवी संमेलनाच्या सुरवातीस राजेश पाटील यांनी

" तु वामनाच्या गीता मध्ये

तु नागनदी पाण्यामध्ये

तु घटनेच्या पानामध्ये

तु बुद्ध धम्म गाथे मध्ये हि गेय रचना सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.


या नंतर प्रा. गजानन सोनोने यांनी संविधान कळाल्यावर त्यांना

ते पेटुन उठल्या शिवाय राहणार नाही

गुलामाला जाणीव झाल्यावर 

जयभीम केल्या शिवाय राहणार नाही

हि रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली .

 

कवयत्री सीमा नरवाडे यांनी 

विषमतेच्या या समाजात

संविधान बीज पेरले समतेचे

ते नाही कुण्या एकट्याचे

ते तर आहे सार्‍या भारतीयांचे

हि कविता सादर करून टाळ्या मिळवल्या .

या नंतर

सांगावाकार प्रा. डॉ. महेंद्र नरवाडे यांनी

घटनेच्या पानातुन

प्रतिष्ठा हि मिळतांना

रुढी प्रिय ग्रंथ आज 

चाळता कशाला हि रचना सादर केली व प्रेक्षकात उत्साह भरला.


कवी अशोक वासाटे यांनी 

दोन वर्षे ११ महीने१८ दिवस

मानवतेला सन्मानाचा साजे अलंकार

भीमाने दिला भारताला नवा अविष्कार

हि गेय रचना मांडली.


कवी रामस्वरूप मडावी यांनी 


"सखल जगी असतील

देशापरत्वे संविधान भारतीय संविधान महान आहे , भारत देश महान 

गीता बायबल कुरान शरीफ असतील धर्मास आदरस्थान या सर्वाहून श्रेष्ठ आहे देशाचे एकच संविधान"

हि सामाजिक रचना सादर केली.


तर वंदना तामगाडगे यांनी

अन्यायावर प्रहार करून तोडले जुल्मी सत्तेचे फास

 समतेसाठी केलीस क्रांती अन् लिहिलेस भारतीय संविधान हि रचना मांडली .


कवयत्री नंदा नगारे यांनी 

हे जीवना जगण्याचा अर्थ सांग ना

जन्म हा म्हातारे होऊन

मरण्यासाठी तर

नाही ना हि सुंदर रचना सादर केली.


सुर्यभान खंदारे यांनी 

संविधानाने भल्या माणसा

काया पालट केला

संविधानाने भल्या माणसा

काया पालट केला

या काव्यातुन संविधानाची महती  स्पष्ट केली .

तर अध्यक्षीय कविता सुभाष बोड्डावार यांनी 

नव्या माणसाचा जन्म होवो येथे

समतेची नाते असो त्याचे

नव्या माणसाला कळो बंधुभाव

असो त्याचा गाव प्रकाशित

हि बहारदार रचना सादर केली.


या कार्यक्रमास चंद्रशेखर सर्पे, सम्यक सर्पे, सुरेंद्र घुले, राहुल घुले( समता सैनिक दल), बंडु भाटशंकर, विनय वैरागडे, समाधान पाटील, प्रा. मनोहर साळवे, प्रा. मायावती सर्पे, दिपाली गिमेकार, माधुरी मुनेश्वर, भारत कावळे यांची प्रमुख उपस्थिती होती तर छाया चित्रण विशाल गिमेकर व निवेदक कानिंदे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमीत शेंद्रे, शिलरत्न पाटील, विजय पाटील, सुगत भरणे, अजमल शेख, शेख फय्याज, कोमल भवरे, अजिंक्य आळणे, साजीद बडगुजर, अॅड सम्राट सर्पे, कपील हलवले, संघर्ष मुनेश्वर, प्रशिक मुनेश्वर, संजीव भवरे, प्रमोद मुनेश्वर , आकाश गोणारकर, साहिल भवरे, प्रवीण पाटील, दिपक पाटील, शंतनु कांबळे आदी 

तसेच या कार्यक्रमास असंख्य महिला व कवी कवयत्री विद्यार्थी बाल बालके यासह क्रांतिसुर्य प्रतिष्ठान पदाधिकारी,स्वाभिमानी युवा सेना पदाधिकारी सदस्य  मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages