सत्यशोधक चळवळीचा इतिहास जीवंत ठेवा..डॉ. गायकवाड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 30 November 2019

सत्यशोधक चळवळीचा इतिहास जीवंत ठेवा..डॉ. गायकवाड

सत्यशोधक चळवळीचा इतिहास जीवंत ठेवा
- डॉ.अशोक गायकवाड

 पुसद जि. यवतमाळ : 
' प्रबोधनकार ठाकरे हे फार मोठे सत्यशोधक होते . त्यांचे सत्यशोधक साहित्य आजच्या पिढीसमोर आलेले नाही . त्यामुळे सत्यशोधक वाड : मय इतिहास जमा होऊ नये , याची काळजी घेऊन सत्यशोधक ग्रंथचळवळ जिवंत ठेवावी ' , असे विचार येथील अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे सचिव डॉ . अशोक गायकवाड यांनी येथील चार्वाक वनात व्यक्त केले . 
            महात्मा फुले समता विचार मंच बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेतर्फे गुरुवारी ( ता . २८ ) महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम झाला , त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ . गायकवाड बोलत होते . संस्थेचे अध्यक्ष अॅड . अप्पाराव मैंद यांनी लिहिलेल्या ' सत्यशोधक यादवराव पाटील आणि यवतमाळ जिल्ह्यातील सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ ' या ग्रंथाचे प्रकाशन पैठण येथील अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे माजी अध्यक्ष प्रा . जी . ए . उगले यांच्या हस्ते यावेळी झाले .
            विचामंचावर निवृत्त सहनिबंधक के . ई . हरिदास , निवृत्त न्यायाधीश भगवान कदम , नांदेड येथील मेडिकल कॉलेजचे निवृत्त अधिष्ठाता डॉ . श्रीराम राठोड , किनवट येथील प्राचार्य शुभांगी ठमके , अमरावती येथील निवृत्त कार्यकारी अभियंता पी . पी . भाले , विदर्भ सत्यशोधक समाजाचे सचिव सतीश जामोदकर , प्राचार्य वि . ना . कदम , प्रा . नरेशचंद्र काठोळे , वणीच्या राणा नूर सिद्दिकी , प्रा . प्रेम हनवते , धम्मपाल माने , निवृत्त जिल्हाधिकारी आर . आर . भवरे , निवृत्त पोलिस अधिकारी भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते . पुसद येथील स्मृतीशेष यादवराव पाटील चौधरी यांनी १९२०च्या कालखंडात सत्यशोधक समाजाच्या शाखा उघडून सामाजिक कार्य केले . हा इतिहास संशोधकाच्या भूमिकेतून लेखन करीत अप्पाराव मैंद यांनी पुस्तक रुपात मांडला . या कार्याची डॉ . अशोक गायकवाड यांनी प्रशंसा केली . या लहान पुस्तकांमधून सत्यशोधक कार्याची प्रेरणा नवीन पिढीला मिळेल , असा आशावादही त्यांनी व्यक्त केला . सत्यशोधक ग्रंथकार जी . ए . उगले यांनी सत्यशोधकाचे मंदिर भारतात कुठेही नाही . मात्र , ते केवळ पुसदमध्ये आहे , असा उलगडा केला . महात्मा फुले यांच्यानंतर सत्यशोधक मार्ग सांगितला गेला . परंतु , त्यावरील अभ्यासक्रम तयार होऊ शकला नाही , अशी खंतही त्यांनी व्यक्त केली . हरिदास यांनी महात्मा फुले यांची निर्मिकाची कल्पना विशद केली .समाजातील जळमटे विद्येने नष्ट होऊ शकतात , हे महात्मा फुले यांनी सांगितले . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षणाचे कार्य केले . आता तर ही विद्याच अनर्थ घडवून आणते की काय , असा प्रश्न निर्माण झाला आहे . महात्मा फुले यांनी जातिभेद व अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले . त्यांचे विचार आचरणात आणण्याची खरी गरज आहे ' , असे मतही त्यांनी व्यक्त केले .
         इतर मान्यवरांसह डॉ . श्रीराम राठोड , प्राचार्य शुभांगी ठमके यांनीही विचार व्यक्त केले . प्रास्ताविक गोवर्धन मोहिते यांनी केले . सूत्रसंचालन शीतल वानखडे यांनी केले . पुस्तक लेखनाची पार्श्वभूमी विशद करून अप्पाराव मैंद यांनी आभार मानले . जिल्हा परिषदेच्या सदस्या वर्षा भवरे , भोलानाथ कांबळे , भीमराव कांबळे , श्रामनेर आनंद बोधी , ताहेरखान पठाण , माजी सभापती सुभाष कांबळे , रेवती बेद्रे , साहेबराव जाधव , के . डी . जाधव , बी . जी . राठोड , डॉ . अभिलाषा आजनकर , राज्यातून आलेले सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते , सत्यशोधक यादवराव पाटील यांच्या नवीन पिढीतील संदीप चौधरी , शिवाजी पारसनाथ , गणेश देशमुख , विलास तायडे , बाबूराव चौधरी , प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

Pages