पोलिस स्थापना दिनानिमित्त किनवट येथे कार्यक्रम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 1 December 2019

पोलिस स्थापना दिनानिमित्त किनवट येथे कार्यक्रम


किनवट येथे महिलाविषयक गुन्हे व त्याचे परिणाम याविषयावर व्याख्यान

किनवट ( प्रतिनिधी): 
           महाराष्ट्र राज्य पोलीस स्थापनादिनानिमित्ताने बुधवारी ( ता.४) सकाळी ११ ते २ यावेळेत शहरातील साईवंदना मंगल कार्यालयात इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ' महिलांच्या सुरक्षित वातावरणासाठी कठोर कायद्याऐवजी सामाजिक बदलाची आवश्यकता, ' या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.             
         राज्यात २२ जानेवारी हा दिवस 'महाराष्ट्र राज्य पोलीस रेझिंग डे ' म्हणून साजरा करण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून येथील साईवंदना मंगल कार्यालयात वादविवाद स्पर्धा तसेच महिलांना जागृत करण्याच्या उद्देशाने 'महिलाविषयक गुन्हे व त्याचे परिणाम ' याविषयावर पावर पॉइंट प्रेझेंटेशन व व्याख्यानाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
           या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह बचत गटांतील महिला, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स व गृहिणींना आमंत्रित करण्यात येणार आहे.वादविवादात स्पर्धेतील विषयासाठी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयातील दोन स्पर्धक अनुक्रमे अनुकूल आणि प्रतिकूल बाजू मांडतील. या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांची राज्यस्तरावरील किनवट - माहूर उपविभागाच्या संघात निवड होणार आहे.स्पर्धेत किनवट,माहूर तालुक्यातील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा,असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक,पोलीस निरीक्षक मारुती थोरात यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages