किनवट तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भंडारे तर सचिवपदी चव्हाण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 2 December 2019

किनवट तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भंडारे तर सचिवपदी चव्हाण

किनवट तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अनिल भंडारे तर सचिवपदी मलिक चव्हाण

किनवट(प्रतिनिधी): किनवट तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी अनिल भंडारे यांची, तर सचिवपदी मलिक चव्हाण यांची अविरोध निवड करण्यात आली.
       बऱ्याच दिवसांपासून रेंगाळत पडलेल्या किनवट तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीची निवड जिल्हा कार्यकारिणीच्या आदेशाने गोकुंदा येथील विश्रामगृहात रविवारी (ता.१) ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव नेम्मानीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
      यावेळी पत्रकार शिवराज राघुमामा, प्रा. जयवंत चव्हाण , अॅड  मिलिंद सर्पे, आशिष देशपांडे, सुरेश मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी अनिल भंडारे यांची, तर सचिवपदी मलिक चव्हाण यांची निवड करण्यात आली.सल्लागार म्हणून व्यंकटराव नेम्मानीवार ,शिवराज राघुमामा,दादाराव कयापाक, मिलिंद सर्पे , बी.एल .कागणे ,शकील बडगुजर, प्रा. जयवंत चव्हाण ,सुरेश मस्के ,आशिष देशपांडे, बाबू नेम्मानीवार ,चतुरंग कांबळे, अरुण तम्मडवार यांची नियुक्ती करण्यात आली.            कार्यकारिणीत उपाध्यक्ष - किरण ठाकरे व किशन परेकार, कार्याध्यक्ष - दत्ता जायभाये, सहसचिव - लक्ष्मीकांत मुंडे व इम्रान अली , कोषाध्यक्ष - नसिर तगाले , सहकोषाध्यक्ष - संतोष अनंतवार, कार्यकारिणी सदस्य केशव डहाके ,गंगाधर कदम ,मधुकर अन्नेलवार, साजिद बडगुजर , एस. अहेमद अली,सुरेश कावळे ,बाळकृष्ण कदम, अंकुश भालेराव संतोष जाधव , प्रमोद जाधव, रवीराज कानिंदे , अक्रम चव्हाण,शे.अय्युब यांचा समावेश आहे.

-----------------------------------------------

No comments:

Post a Comment

Pages