घरीच केले मशरुमचे उत्पादन: अॅड. शंकर राठोड यांचा उपक्रम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 13 December 2019

घरीच केले मशरुमचे उत्पादन: अॅड. शंकर राठोड यांचा उपक्रम

घरीच केले मशरुमचे उत्पादन: अॅड. शंकर राठोड यांचा उपक्रम

किनवट :उद्योग किंवा व्यवसाय करायला वयाचे बंधन नसते, ते केंव्हाही सुरु करता येऊ शकते.ईच्छा तेथे मार्गही काढता येतो. याबाबतचे एक उत्तम उदाहरण म्हणून येथील एका जेष्ठ वकीलाचे देता येईल. 
      किनवट न्यायालयातील एक जेष्ठ वकील व वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड.शंकर राठोड (वय ७०) यांनी साधारण सात महिन्यांपूर्वी पुणे येथे जाऊन मशरुम उत्पादनाचे प्रशिक्षण घेतले व स्वत:च्या घरी मशरुम उत्पादनाला सुरुवात केली.  उत्पादन केलेल्या मशरुम उत्पादनाचा पहीला लाट त्यांनी आपल्या मित्रपरिवारात मोफत वाटला. आता त्यांचा दुसरा लाट सुरु आहे. दर्जेदार मशरुम त्यांच्याकडे मिळत असल्याने ग्राहकही आता त्यांच्याकडून ४०० रुपये किलो दराने मशरुम  विकत घेत आहेत. त्यांच्याशी एका हाॅटेल व्यवसायीकानेही मश्रुम खरेदिसाठी नुकताच संपर्क साधला आहे.
     आजच्या काळात शेती परवडत नाही,अशी ओरड करणा-यांनी व शेती क्षेत्रात काही तरी नवीन आणि भरीव अस योगदान देण्याची जिद्द असणा-या शेतक-यांनी शेतीला जोडधंदा म्हणून  मशरुम उत्पादनाची कास धरावी व आपला आर्थिक विकास करुन घ्यावा ,असा संदेश त्यांनी तरुण शेतकरी मित्रांना दिला आहे.
     शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी स्वंयदीप या नावाने शेतकरी उत्पादक कंपनीची ही त्यांनी स्थापना केलेली आहे.ज्या वयात माणसं ठप्प होऊन निवांत बसतात त्या वयात राठोड हे खरच आपल्यासाठी प्रेरणा देणारे व्यक्ति ठरणारे आहेत,एवढे मात्र खरे आहे.

     मशरुम विषयी माहिती देतांना त्यांनी सांगितले की,मशरुमचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत;
     मशरुम बऱ्याच लोकांना आवडतं आणि बऱ्याच लोकांना त्याचा वास सुद्धा नको वाटतो. मशरुमचे सूप्स, भाजी आणि इतरही अनेक पदार्थ आजकाल सहज बाजारात उपलब्ध आहेत. ज्यांना आवडत नाही त्यांनी सुद्धा मशरुम खायलाच हवे, कारणं...
👉 ते ब्लड प्रेशर सारख्या आजारांना नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
👉 त्यात कार्बोहाइड्रेटची पर्याप्त मात्रा असल्यामुळे ते कब्ज, अपचन, अती अम्लीयतासमेत पोटाच्या विभिन्न विकारांना दूर करते.
👉 मधुमेहाच्या रुग्णांना जे काही हवे असते ते सर्व मशरुम मध्ये उपलब्ध आहे. यात व्हिटॅमिन, मिनरल आणि फायबर असतं. ते शरीरात इन्सुलिन निर्माण करतं.
👉 त्यात लीन प्रोटीन समाविष्ट आहे, जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतं.
👉 त्यात सोडियम सॉल्ट देखील नसते, त्यामुळे लठ्ठपणा, किडनी व हृदयघात रुग्णांसाठी हा आदर्श आहार आहे.
👉 मशरुम मध्ये लोह घटक तसे तर कमी प्रमाणात असतात, पण रक्तात हिमोग्लोबिनची पातळी कायम राखायला मदत करतात. यात बहुमूल्य फॉलिक ऍसिडची उपलब्धता असते, जी फक्त मांसाहारी खाद्य पदार्थांपासून प्राप्त होते.
------------------------------------------------

1 comment:

Pages