किनवट येथे ADIP या योजने अंतर्गत दिव्यांगाचे शिबिर होणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 13 December 2019

किनवट येथे ADIP या योजने अंतर्गत दिव्यांगाचे शिबिर होणार

किनवट येथे  ADIP या योजने अंतर्गत १५ व १६ डिसेंबर होणाऱ्या शिबीरासाठी दिव्यांगाची नाव नोंदणी सुरु 

किनवट :
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार, भारतीय कृत्रिम अंग निर्मान निगम , जिल्हा प्रशासन नांदेड,जि दिव्यांग पुनर्वसन केंद्र  व जिल्हा परिषद व समाजकल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव सहाय्यक उपकरणे व वयोश्री योजने अंतर्गत सेवाज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत विविध साधने व संसाधने वाटपासाठी मातोश्री कमलताई ठमके इंग्लीश स्कूल, कोठारी ( चि), ता. किनवट येथे दि. 15 व 16 डिसेंबर रोजी शिबीर आयोजित केली असून
दिनांक 04 ते 14  डिसेंबर 2019 सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाव नोंदणी करुन घेण्याचे प्रशासनाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे .
          यासाठी पंचायत समिती, किनवट येथे दिव्यांग नोंदणी कक्ष स्थापन केला आहे . या कक्षात दिव्यांगांची नोंदणी कामासाठी पी.जी. कांबळे, एम.बी.वायकुळे, के.डी. तोडकर व एस.व्ही. बनकर यांची नियुक्ती करण्यात आली असुन आज पर्यंत एकुण 600 दिव्यांगांची नोंदणी झाली आहे.
         मातोश्री कमलताई ठमके इंग्लीश स्कूल, कोठारी ( चि), ता. किनवट येथे दिनांक 15 व 16 डिसेंबर 2019 रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे . या शिबिराला किनवट तालुक्यातील दिव्यांगांनी व ज्येष्ठांनी उपस्थित राहावे असे अवाहन प्र. उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार नरेंद्र देशमुख , पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने
 यांनी केले आहे .

No comments:

Post a Comment

Pages