लोणी शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 13 December 2019

लोणी शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद

लोणी शाळेत कमठाला केंद्रांची शिक्षण परिषद उत्साहात सपन्न

किनवट : जिल्हा परिषद कमठालाची केंद्रीय शिक्षण परिषद लोणी जिल्हा परिषद शाळेत नुकतीच संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी शिक्षणविस्तार अधिकारी शिवाजी खुडे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप गुंजकर, केंद्रिय मुख्याध्यापक शरद कुरुंदकर,अंकुश राऊत, विषयतज्ञ कांबळे आणि मोगरकर होते.


      प्रारंभी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायल्यानंतर प्रस्तुत शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांचा लोणी शाळेच्या वतीने व केंद्राच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात केंद्रातून बदली होऊन गेलेले शिक्षक रमेश पवार, उमेश डाखोरे, सुमेध भवरे, सत्यभामा भगत व उर्मिला परभणकर ह्यांना निरोप  देण्यात आला. नविन आलेले शिक्षक विद्या श्रीमेवार, राजू भगत, बाबासाहेब आढाव यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी निरोप मुर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले.
   
      दुसऱ्या सत्रामध्ये सिआरजी सदस्य राजेश मोरताडे यांनी समाजशास्त्र विषयावर सखोल मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख शिवाजी खुडे यांनी प्रशासकिय सुचना दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लोणी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका शाहिण बेग ह्यांने तर आभार विद्या श्रीमेवार या तंत्रस्नेही शिक्षिकेने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी केंद्रांतर्गत राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षका शालिनी सेलुकर, प्रितम पाटील, धनरेखा सांगवीकर, अनुसया वाकोडे, प्रेमिला जाधव, सुनिता गरड, परमेश्वर महामुने, देविदास वंजारे, राजेश गोवळकोंडावार, प्रशांत शेरे, वाढे, मडावी, आदी शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages