मारेगाव संकुलाची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
किनवट :
मारेगाव ( वरचे ) संकुलाची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद अनेक उपक्रमाने उत्साहात संपन्न झाली. याच औचित्याने बदली झालेल्यांना निरोप व नवागतांचे स्वागत करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळबोरगाव येथे मारेगाव ( वरचे ) संकुलाची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. केंद्रप्रमुख विजय मडावी अध्यक्षस्थानी होते. उपसरपंच संतोष राठोड, केंद्रिय मुख्याध्यापक रमेश खुपसे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रानबा पाटोळे, मुख्याध्यापक शंकर जाधव, गंगाधर पुलकंटवार, दीपक राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सोमा पाटील यांनी प्रास्ताविक केले. वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे सुरेश पाटील यांनी स्वागत गीत व ‘अशी पाखरे येती आणि स्मृति ठेऊनी जाती ‘ हे निरोप गीत गाईले व सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक बालाजी जाभाडे यांनी आभार मानले.
याच कार्यक्रमाचं औचित्य साधून बदली झाल्यामुळे उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर, पदवीधर पदोन्नतीने बदली झालेले उत्तम कानिंदे, रवि नेम्माणीवार व देविदास राऊलवाड यांना निरोप देण्यात आला. प्रमुख पाहुणे, निरोपमूर्तीसह प्रदीप कुडमेथे यांनी मनोगत व्यक्त केले. केंद्रात बदलीने आलेल्या नवागत शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. सीआरजी सदस्य व मान्यवरांनी केंद्रातील तंत्रस्नेही शिक्षक उल्हास लोहकरे व रूपेश मुनेश्वर यांच्या सहकार्याने पीपीटी सादरीकरणातून समजशास्त्र विषयाची अध्ययन निष्पत्ती, अनापान ( विपश्यना ), दीक्षा अॅप व ऑनलाई कामकाजाचे इतर शैक्षणिक अॅप याबद्दल विस्तृत माहिती दिली.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी फहीम सनाउल्ला खान, ज्ञानेश्वर खोकले, उषा पवार, क्रांती श्रीमनवार आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व शिक्षक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment