संत सेनानी चिमणाजी.... पाटील
भारतीय बोद्ध महासभा शाखा-अंबाडी द्वारा आयोजित महान संत सेनानी चिमणाजी महाराज यांचा 82 वां स्मृतिदिनी त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी भव्य बौद्ध मेळाव्याचे बॅनरखाली संपुर्ण बौद्ध समाज एकत्रित होतो.
महाराष्ट्रात विविध संत होऊन गेले.त्यात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, क्रांतिकारी संत तुकाराम, रामदास, एकनाथ... ते गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशी ही संतसाखळी वाढविता येईल. या संत साखळीत आपले कार्य आणि कर्तृत्वाने दिमाखदारपणे ऊठून दिसणारे संत म्हणजे संतसेनानी चिमणाजी महाराज होत. केवळ महाराष्ट्रच नाही तर आध्रप्रदेश, तेलंगाना राज्यात त्याच्या विचारांचे अनुकरण आणि अनुसरण करणारा डोळस भक्त संप्रदाय दिसून येतो. ही त्यांच्या विज्ञानवादी कार्यचिच पावती आहे.
संत सेनानी चिमणाजी महाराज यांचा जन्म 1833 च्या आसपास तेलंगाना राज्य मधील सिरसमला येथे 'पाटील' घराण्यात झाला. वडील हानगुजी,आणि मोठेबंधू राजा यांनी चिन्नयाचा सांभाळ केला, आईचा जिव्हाळा त्यांना मिळाला नाही कारण ते सात वर्षाचे असतांना त्यांच्या आईचे निर्वाण झाले.
सिरसमला आणि जवळपासच्या पंचक्रोशीमध्ये ते सहकारी वृतीची दानवीर व्यक्ति म्हणून प्रसिद्ध होते.'प्रपंच' व 'पपरोपकार'त्यांनी नेटका केला. त्यांचा कार्यकाळ म्हणजे इंग्लिश सरकारच्या धामधुमीचा काळ, परंतु अशांत स्थितित कर्मकांडाला तिलांजलि देऊन माणसाने नेहमी पुढेच जावे... अज्ञान म्हणजे अंध:कार... अंध:कार केवळ प्रकाशच नष्ट करू शकतो.म्हणुन आपल्या अनुयायांना प्रकाशाकडे चला असाच मूलमंत्र दिला.
समकालीन स्थितिचा सम्यक् विचार करता 'महार' जातीत जन्म।ला येऊन कोणत्याही दगडधोंण्डाची पुजा करण्यापेक्षा आपल्या सदविवेक बुद्धीला शरणं जा! अशा परिवर्तन वादी विचारांची पेरणी त्यांनी त्यांच्या अनुयायात केली.
आज समाजात आसाराम, राम रहीम, रॉधे मॉ सारखी भ्रष्ट माणसे संत आणि महाराजपणाची बुरखे पांघरुण कंगाल वर्तन करत असतांना साध्या माणसामध्ये राहून साधे जीवन जगून माणूसपणाची शिकवण देणारा संत, संतसेनानी चिमणाजी महाराज ऊठून दिसतात.
संदर्भ:1) आयु.रामचंद्र विठ्ठल देठे यांचा पेपरलेख
2) दादाराव गोविंदराव कयापाक यांचा पेपरलेख
3) संत साहित्य-आकलन आणि अध्यापण, msce पुणे
शब्दांकन:- राजा तामगाडगे, किनवट
Tuesday 25 February 2020
संत सेनानी चिमणाजी.... पाटील
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment