सकल मातंग समता परिषदेच्या अध्यक्षपदी के.मुर्ती,तर सचिवपदी दुर्गादास बटुर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 26 February 2020

सकल मातंग समता परिषदेच्या अध्यक्षपदी के.मुर्ती,तर सचिवपदी दुर्गादास बटुर

सकल मातंग समता परिषदेच्या अध्यक्षपदी के.मुर्ती,तर सचिवपदी दुर्गादास बटुर

किनवट : मातंग समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच समाज हिताच्या विविध मागण्या शासन दरबारी रेटून धरण्यासाठी किनवट- माहूर तालुक्यातील मातंग समाजाची महत्वपूर्ण बैठक नुकतीच  किनवट येथील जिल्हा परिषद विश्रामगृहात संपन्न झाली. 
    या बैठकीत सकल मातंग समता परिषदेची स्थापना होऊन अध्यक्षपदी के. मूर्ती तर कार्याध्यक्षपदी दुर्गादास बटुर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
                 किनवट व  माहूर तालुक्यात मातंग समाज हा मोलमजुरी व काबाडकष्ट करून जगतो. या समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही अद्याप सुटलेले नाहीत. शिक्षण, रोजगार तसेच मूलभूत सोयी सुविधांपासून हा समाज आजही वंचित आहे. शिवाय मातंग समाजाचे अनेक प्रश्न आजही शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळे मातंग समाजाचे प्रश्न मार्गी लावून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माजी नगराध्यक्ष के. मूर्ती यांच्या पुढाकारातून किनवट माहूर तालुक्यातील मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
               बैठकीच्या अध्यक्षस्थानी मातंग समाजाचे तालुका अध्यक्ष शिवन्ना कलगोटवार हे होते. बैठकीत मातंग समाजाच्या सामाजिक राजकीय तसेच आर्थिक परिस्थितीवर सांगोपांग चर्चा होऊन समाजाच्या हिताच्या प्रश्नासाठी आंदोलन मोर्चे करण्यासंदर्भात दिशा ठरविण्यात आली. तसेच माजी नगराध्यक्ष के. मूर्ती यांच्या सूचनेनुसार बैठकीत सकल मातंग समता परिषदेची स्थापना करण्यात येऊन या परिषदेच्या अध्यक्षपदी के. मूर्ती यांची तर कार्याध्यक्षपदी दुर्गादास बटूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सकल मातंग समाजाचा परिषद ही दि. ३ मार्च पासून किनवट व माहूर तालुक्यात दौरा करून मातंग समाजाच्या कुटुंबांना भेटणार आहे. तसेच समाजाच्या अडीअडचणी जाणून घेणार आहे. समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर त्यांच्या शासकीय सोयी सवलती व सामाजिक प्रश्नांवर मातंग बांधव व युवकांना ही परिषद मार्गदर्शन करून जन जागृती करणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
              या बैठकीत नारायण सांगळे, आडेलु बोनगीर, जनार्धन काळे यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केले व यापुढे सामाजिक उपक्रम राबवत असताना समाजाच्या प्रश्नासाठी आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन स्वामी नूतपेल्लीवार यांनी केले तर, नरसिंग कारपेंटर यांनी उपस्थितांचे आभार मानले. बैठकीत बापूराव माहुरकर, दिगंबर गादेकर, लिंगन्ना कोतूरवार, राज माहुरकर, संजय कोतूरवार, स्वामी मुर्ती यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Pages