सारखणी येथे 28 व 29 रोजी सेवालाल जयंती सोहळा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 27 February 2020

सारखणी येथे 28 व 29 रोजी सेवालाल जयंती सोहळा

सारखणी येथे 28 व 29 रोजी सेवालाल जयंती सोहळा
किनवट : तालुक्यातील सारखणी येथे 28व 29 असे दोन दिवस संत सेवालाल जयंती निमित्त गोर बंजारा लेंगी स्पर्धा आयोजित केली आहे .
              या स्पर्धेत एकूण दहा बक्षीस ठेवण्यात आले आहे
या लेंगी स्पर्धेचे उदघाटन जि. प. चे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या हस्ते होणार आहे .माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होईल तर स्वागताध्यक्ष म्हणून प्रा.कैलास राठोड हे असतील.    पुरुष व महिला अश्या दोन ही स्पर्धा होणार आहे. पुरुष गटात प्रथम 71 हजार रु. ,द्वितीय 51 हजार रु. , तृतीय 31 हजार रु. , चतुर्थ 21 हजार रु. , पंचम 11 हजार रु. , असे आहे. तसेच महिला गटात अनुक्रमे प्रथम 51 हजार रु., द्वितीय 31 हजार रु ., तृतीय 21 हजार रु ., चतुर्थ 11 हजार रु., पंचम 7 हजार रु.,
असे बक्षिसांचे स्वरूप आहे .
अशी माहिती आयोजक विशाल जाधव यांनी दिली आहे .

No comments:

Post a Comment

Pages