'मुकनायक' शताब्दी निमित्त. आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राच्या वतीने बुधवारी पत्रकारांचा गौरव सोहळा. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 1 February 2020

'मुकनायक' शताब्दी निमित्त. आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राच्या वतीने बुधवारी पत्रकारांचा गौरव सोहळा.


'मुकनायक' शताब्दी निमित्त.
 आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राच्या वतीने      बुधवारी पत्रकारांचा गौरव सोहळा.


नांदेड : विश्वभूषण , भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.३१जानेवारी १९२०  'मुकनायक' ची सुरुवात केली.दि.३१ जानेवारी २०२० रोजी 'मुकनायक'ला १००वर्ष पूर्ण झाली आहेत.'मुकनायक'च्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्र यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचा गौरव सोहळा बुधवारी (दि.५) सायंकाळी पाच वाजता आंबेडकरवादी मिशन डाॅ‌.आंबेडकर चौक,(लातूर काॅर्नर)सिडको, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.  
    या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरवादी अभ्यास मिशनचे प्रमुख दीपक कदम हे राहतील,तर प्रमुख पाहुणे म्हणून दै.'सम्राट', मुंबई चे मुख्य संपादक बबन कांबळे,दै.'लोकमत', नांदेडचे आवृती संपादक विशाल सोनटक्के व मराठी पत्रकार परिषद, मुंबई चे विभागीय सचिव प्रकाश कांबळे हे उपस्थित राहणार आहेत.
   या सोहळ्यास उपस्थित रहावे,असे आवाहन आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

Pages