ग्रामीण भागात खासगी रुग्णालयांची " दारे बंद" कोरोनाची धास्ती ; सामान्य रुग्णांची मात्र होळसांड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 26 March 2020

ग्रामीण भागात खासगी रुग्णालयांची " दारे बंद" कोरोनाची धास्ती ; सामान्य रुग्णांची मात्र होळसांड

ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांची "दार बंद"
कोरोनाची धास्ती; सामान्य रुग्णांची मात्र  हेळसांड


नांदेड :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अख्या जगात हाहाकार माजवलाय. तर भारतातही याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू केलाय, तर अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले असतांनाही ग्रामीण भागातील खासगी दवाखान्यांनी आपले दार बंद केले असल्याने यामुळे सामान्य रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे.

मागच्या काही महिन्यांपासून जगभरात कोविड-१९ या विषाणूने थैमान घातले आहेत. यात चीन,अमेरिका, इटली यासारखे प्रगतशील देशांचाही समावेश आहे. हळूहळू या विषाणूने भारतातही आपले पाय पसरवायला सुरुवात केली आहे. मात्र केंद्र सरकार व राज्य सरकारने यावर वेळीच उपाय योजनाना सुरुवात केली आहे. राज्य सरकारने यापूर्वीच 31 मार्चपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली तर केंद्र सरकारनेही आता 21 दिवसांची संचारबंदी संपूर्ण देशात लागू केली आहे. या संचारबंदीमध्ये जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या गोष्टींना वगळण्यात आले आहे.

दरम्यान सर्व रुग्णालयांना या संचारबंदीत आपापली रुग्णालय नियमित सुरू ठेवण्याच्या सूचना दिलेल्या असताना मात्र नांदेड जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांनी आपली रुग्णालयाची दार बंद केल्याने सामान्य रुग्णांची यामुळे मोठी हेळसांड होत आहे. साध्या आजारासाठीही तालुका किंवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांना घेवून जावं लागतं आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती जर डॉक्टरांनीचं घेतली असेल तर सामान्य जनतेचे काय हाल होत असतील सांगायला पर्याय शिल्लक नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने आशा खासगी डॉक्टरांचे परवाने का रद्द करू नये असा सवाल आता सामान्य नागरिक करत आहेत. त्यामुळे अशा गंभीर परिस्थिती आपली रुग्णालय बंद ठेवणाऱ्या खासगी डॉक्टरांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागीकातून होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages