नांदेड दि. 28 :- जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचे एकुण दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळली होती. त्यापैकी नांदेड पिरबुऱ्हाणनगर येथील व्यक्तीचा सहा दिवसाच्या उपचारानंतर तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक परिस्थिती असून आतापर्यंत क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची एकूण संख्या 985 एवढी आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 285 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 81 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 108 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 877 अशी संख्या आहे.
तपासणीसाठी एकुण 799 नागरिकांचे नमुने घेण्यात आली होती. त्यापैकी 729 नमुने निगेटीव्ह आली आहेत. तर 62 नमुन्यांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने नाकारण्यात आली आहेत.
नांदेड जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 82 हजार 271 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे.
Tuesday, 28 April 2020

Home
जिल्हा
कोरोनाचा एक संशयित रुग्ण निगेटिव्ह ; नांदेड जिल्ह्यासाठी दिलासादायक परिस्थिती ; 799 नमुने तपासणीसाठी त्यापैकी 729 नमुने निगेटिव्ह 62 नमुन्यांचा अहवाल बाकी तर 5 नाकारण्यात आली
कोरोनाचा एक संशयित रुग्ण निगेटिव्ह ; नांदेड जिल्ह्यासाठी दिलासादायक परिस्थिती ; 799 नमुने तपासणीसाठी त्यापैकी 729 नमुने निगेटिव्ह 62 नमुन्यांचा अहवाल बाकी तर 5 नाकारण्यात आली
Tags
# जिल्हा
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment