हिंगोली लोकसभा मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना फवारणी मशीन द्यावी-खा. हेमंत पाटील - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 19 April 2020

हिंगोली लोकसभा मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना फवारणी मशीन द्यावी-खा. हेमंत पाटील

हिंगोली लोकसभा मतदार संघातील  प्राथमिक आरोग्य केंद्रांना फवारणी  मशीन द्यावी - खासदार हेमंत पाटील




 किनवट : हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात फॉगींग मशीन (औषध  फवारणी यंत्र ) तात्काळ खरेदी करावेत, असे निर्देश खासदार हेमंत पाटील नांदेड ,हिंगोली ,यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत .
                   सध्याची परिस्थिती विषाणू संसर्गाची असल्याने सगळीकडे स्वच्छता राहावी या उद्देशाने आरोग्य, प्रशासकीय  यंत्रणा झपाटून कामाला लागली आहे. कोरोना सारख्या जीवघेण्या विषाणूमुळे  संपूर्ण जग हादरून गेले आहे . त्यामुळे  देशात आणि राज्यात शहरी भागासोबतच  ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर करण्यात येत आहेत . खासदार हेमंत पाटील यांनी  कोरोना  विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण हिंगोली मतदार संघाचा दौरा केला यामध्ये त्यांनी मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्राना भेटी देऊन त्याठिकाणी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली यावेळी त्यांना अनेक ठिकाणी सुविधांचा अभाव आढळून आला . हिंगोली लोकसभा मतदार संघात हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुके , नांदेड जिल्ह्यातील ४ तर यवतमाळ जिल्हयातील २ तालुक्याचा समावेश होतो . क्षेत्रफळ प्रचंड मोठे असल्याने बहुतांश भाग आदिवासी बहुल आहे . त्यामुळे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व सोयी सुविधा असाव्यात जेणे करून साथ  रोगाच्या काळात विषाणूचा प्रादुर्भाव रोखता आला पाहिजे . धूर व औषध फवारणी करून गावोगावी निर्जंतुकीकरण करण्यासाठी फॉगिंग मशिन्स उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी खासदार  हेमंत पाटील यांनी तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages