गझलसाम्राट सुरेशभट यांची आज जयंती. त्या निमित्त हा प्रासंगिक लेख देत आहोत.जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन... !!!
- संपादक
काल ज्ञानसूर्य , विश्वावंद्य , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती #कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर अवघ्या विश्वात घरातच साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आलं ... आज मराठी साहित्यातील गझळसाम्राट .... महान कवी ... गीतकार ...सुरेश भट यांची जयंती ...हे दोन्ही दिवस महाराष्ट्रातील जनतेसाठी अविसमरणीय असे आहेत ... करण महाराष्ट्रातील या दोन्ही पुत्रांचा आम्हा मराठी भाषिकांना सार्थ अभिमान वाटतो ...
सुरेश भट म्हटलं की अवलिया कवी , गझलकार असं सहजपणे म्हटलं जातं ... कारण त्यांच्या जगण्या ...बोलण्यात ...लिहिण्यात बिनधास्तपणा ओतप्रोत भरलेला होता ...पण तो फसवा ...लबाड नव्हता ...सरळ ...आणि प्रामाणिक होता ...,म्हणूनच त्यांनी तो सांगूनही टाकला आहे ....
पटले न जगाशी माझे
साऱ्यांना नडलो आहे
मजलाच अचंबा वाटे
मी कैसा घडलो आहे ...
त्यापुढे ते म्हणत ... ते प्रेतेकाला आपल्यासाठीच सुरेश भटांनी लिहिलं आहे असं वाटतं ...
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते
गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
पाऊस कधी वाऱ्याने माघारी वळले होते ?
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
याचेच रडू आले की जमले न मला राडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुत मिसळले होते
नुसतेच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे ह्दयाशी मी भास कळवले होते
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते
मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते
Wednesday 15 April 2020
Home
विशेष
गझलसाम्राट सुरेशभट यांची आज जयंती. त्या निमित्त हा प्रासंगिक लेख देत आहोत.जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन... !!! - संपादक
गझलसाम्राट सुरेशभट यांची आज जयंती. त्या निमित्त हा प्रासंगिक लेख देत आहोत.जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन... !!! - संपादक
Tags
# विशेष
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
विशेष
Labels:
विशेष
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment