किनवट ( तालुका प्रतिनिधी ) :
" बुद्ध घरात बुद्ध दारात
बुद्ध मेंदूत बुद्ध हृदयात
युद्धा आधी बुद्ध, युद्धानंतर बुद्ध
अशोका आधी बुद्ध, अशोका नंतरही बुद्ध
बाबासाहेबा आधी बुद्ध, बाबासाहेबा नंतरही बुद्ध
फक्त बाबासाहेबांनी दाखवलेला बुद्धच एक जीवन मार्ग.. "
कवी संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. अंबादास कांबळे यांच्या कवितेने धम्म कविसंमेलनात सुरुवात झाली. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत सम्यक सम्बुद्ध यांची जयंती क्रांतीसूर्य व्हाट्सअॅप समूहात ऑनलाइन साजरी करण्यात आली.
प्रारंभी बोधीपुजा व उपस्थित मान्यवरांचे स्वागत क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे उत्तम कांनिदे व रमेश मुनेश्वर यांनी केले. महेंद्र नरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. राजा तामगाडगे यांनी आभार मानले.
यवतमाळ येथील गझलकार रमेश बुरबुरे यानी जबरदस्त रचना सादर केली..
"काळोखाला दूर सारते बुद्ध पौर्णिमा
चांदोबाला जवळ आणते बुद्ध पौर्णिमा
माझी आई मला भासते जनू सुजाता
तिच्या हातची खिर चाखते बुध्द पौर्णिमा "
यानंतर अमरावतीचे प्रा.सुभाष गडलिंग यांनी 'सिध्दार्थ' रचना सादर केली..
" प्रत्येक ह्रदयात असतो
एक सत्यान्वेषी,
जो दुःखाची दवा शोधू पाहतो..
जन्म जरा मृत्यूचे,
नवे अर्थ लावू पाहतो.. "
नांदेड येथील चंद्रकात कदम यांनी गझल सादर करून वाहवा मिळवली..
" आयुष्य प्रत्येकास जर समृद्ध पाहिजे
हृदयात साऱ्यांच्याच गौतम बुद्ध पाहिजे
आपापल्या हृदयातला सिद्धार्थ ओळखू
देशात करुणेच्या कुणाला युद्ध पाहिजे "
घाटंजी येथील कवी प्रितम देवतळे यांनी बाबासाहेबावर रचना सादर केली..
" हीन दीनाच्या दुःखासाठी
झीजला तू भिमराया..
आई होऊन तू बहुजनांना
लाविलास माया.. "
गीतकार सुरेश शेंडे, किनवट यांनी गेय कविता सादर करून वाहवा मिळविली..
" होता रुढीचा अंधार दाट
तुला दिधली नवी पहाट
निळी निळी ही आकाश धरणी रं तू लीन हो बुद्धाच्या चरणी.. "
लॉकडाऊनच्या काळात घर घर बुद्ध जयंती साजरी करूया या उपक्रमांतर्गत क्रांतीसुर्य परिवाराने 'बुद्ध महोत्सव' आयोजित केला होता तीन सत्रात घेतलेल्या या बुद्ध महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला.
'धम्म कविसंमेलनात' सहभागी कविंनी उत्तमोत्तम रचना सादर करून बुद्ध विचारांचा जागर केला.
कार्यक्रमास नायब तहासिलदार सर्वेश मेश्राम, अशोक निमसरकर, रूपेश मुनेश्वर, प्रा. डॉ. उत्तम शेन्डे, माधव सरपे, शाहिर चंद्रकांत धोटे, अभि. सचिन गिमेकर, प्रा.सुबोध सरपे, राजू कांबळे, शेषराव पाटील, भारतध्वज सर्पे, विजय भगत, अनिल गिमेकर, , जयपाल भालेराव, अनिल भवरे, धनराज हलवले, सोमा पाटील, दिलीप कावळे, राजकुमार खरतडे, दिलीप भगत, मोहन भवरे, अजय पाटील, प्रमोद तामगाडगे, अनिल उमरे, सुजाता पोपलवार, सत्यभामा भगत, कुसुम भवरे, सविना मुनेश्वर, करुणा पवार, प्रीती भवरे, यांच्यासह समूहातील सर्व सभासद ऑनलाईन उपस्थित होते.
No comments:
Post a Comment